संकुचित मानसिकता !

‘बौद्ध कायदा होण्यासाठी येणार्‍या काळात आपल्या विचारांचे खासदार लोकसभेत पाठवा’, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी एका परिषदेत बोलतांना केले. बौद्ध कायदा देशात लागू करावा, असे त्यांना का वाटते ? भारत हा काही बौद्ध धर्मीय देश नाही. जपान, श्रीलंका, पूर्व आशिया कडील देश हे बौद्ध धर्मीय आहेत. त्यांच्याकडील नागरिकांनी मागणी केली, तर ते समजण्यासारखे आहे; परंतु तेथेही तो कायदा नाही. उद्या मुसलमान, ख्रिस्ती आणि जैनसुद्धा अशी मागणी करतील. ती शासनाने मान्य करावी का ? अशाने देशात अराजक माजायला वेळ लागणार नाही.

आपल्या विचाराचे खासदार म्हणजे कोणत्या विचाराचे ?, हे समजत नाही. त्याचा अर्थ काढायचा झाला, तर ‘आपले विचार’ म्हणजे बौद्ध धर्माला अनुकूल आणि हिंदु धर्माला विरोध करणारे विचार असे त्यांना म्हणायचे आहे का ? आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या मागण्या करून वेगळी अस्मिता जपण्याचा उद्योग राजकारणी करतात. त्यांचे आचरण तरी ठरवलेल्या तत्त्वांनुसार असते का ? दया, प्रेम, करुणा, परोपकार, शुद्ध वर्तन हे बुद्धाने सांगितले. अहिंसा तत्त्वही सांगितले. यांचाही विचार व्हावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. मधल्या काही वर्षांत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या वेळी तर याची प्रकर्षाने जाणीव होते. तसेच एरव्ही हिंदु राष्ट्र असा उच्चार कोणी केल्यास, त्याविषयी आकांडतांडव करणारी प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी अशाप्रसंगी मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगतात. हासुद्धा त्यांचा दुटप्पीपणा आहे, हे जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे.

राजकारण आणि सत्ताकारणच केंद्रबिंदू !

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात होत असलेल्या काही युतींमुळे सर्वसामान्यांच्या मनात ‘राज्याचे पुढे कसे होणार ?’, यामुळे प्रश्‍नचिन्ह उभे रहात आहे. मध्यंतरी काही लोकांनी टिपू सुलतानच्या वंशातील व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून एका कार्यक्रमाला आमंत्रित केले होते. त्यामध्ये टिपूला क्रांतीकारक म्हणून संबोधले होते. भारिप आणि एम्आयएम् या पक्षांची युती झाली. त्यामध्ये एम्आयएम्चा कित्ता गिरवत ‘भारतमाता की जय’ म्हणण्याची बळजोरी कोणी करू शकत नाही, असे वक्तव्य भारिपकडून करण्यात आले. यामुळे छत्रपतींच्या महाराष्ट्राची वाटचाल नेमकी कुठे होणार आहे ?, असा प्रश्‍न पडतो. ही दु:स्थिती दूर करण्यासाठी लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेशिवाय पर्याय नाही .

– श्री. सुनील लोंढे, ऐरोली, नवी मुंबई.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now