काश्मीरमध्ये होत असलेल्या कथित हत्यांचे कारण पुढे करत मुसलमान सनदी अधिकार्‍याचे त्यागपत्र

  • सैन्यावर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांविषयी ‘ब्र’ही न काढणार्‍या; पण त्याच देशद्रोह्यांच्या मृत्यूला ‘हत्या’ संबोधून सैन्यदलावर चिखलफेक करणार्‍या सनदी अधिकार्‍यावर कोणी देशद्रोहाचा आरोप केल्यास चुकीचे काय ? अशांनी पदावर असतांना घेतलेले सर्व निर्णयही पडताळून बघणे आवश्यक आहे !
  • मुसलमान लाथाडत असतांना त्यांना जवळ करू पहाणारा भाजप, हा हिंदू त्याला जवळ करण्यास सिद्ध असतांना त्यांना मात्र लाथाडतो, हे लक्षात घ्या !

श्रीनगर – भाजप सरकारविषयी खेद व्यक्त करत काश्मीरमधील सनदी (आयएएस्) अधिकारी शाह फैजल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. काश्मीरमध्ये होत असलेल्या हत्या (?) आणि केंद्र सरकारकडून विश्‍वासार्ह राजकीय कृतीची उणीव यांमुळे त्यागपत्र देत असल्याचे त्यांनी सांगितले. फैजल हे राजकारणात प्रवेश करणार असून येणार्‍या लोकसभा निवडणुकीत त्यांना नॅशनल कॉन्फरन्सकडून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी फैजल यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now