चीनने स्वतःच्या सैन्याला अत्याधुनिक ‘हॉवित्सर’ तोफा पुरवल्या !

तिबेटमधील संरक्षण खर्चातही दुपटीने वाढ

  • कुठे भविष्यात उद्भवू शकणार्‍या संकटासाठी आधीच सिद्ध असलेले चीन सरकार, तर कुठे भारत अंतर्गत आणि बाह्य शत्रूंनी पूर्णत: घेरलेला असूनही केवळ सत्ता मिळवण्यासाठी धडपड करणारे देशातील स्वार्थी राजकारणी !
  • सरकार धूर्त चीनचा सामना कसा करणार आहे ?

बीजिंग – चीनने तिबेटमधील त्याची ताकद वाढवण्यासाठी स्वतःच्या सैन्याला अत्याधुनिक ‘मोबाईल हॉवित्सर’ तोफा पुरवल्या आहेत. त्या आता सिद्ध ठेवण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

डोकलाम येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या वादानंतर चीनने त्याच्या डोकलाममधील सैनिकांना अत्याधुनिक शस्त्रसाठा पुरवला. अद्ययावत शस्त्र आणि रणगाडेही पुरवले आहेत. त्याचप्रमाणे तिबेटमधील संरक्षण खर्चातही दुपटीने वाढ केली आहे. बर्फाळ प्रदेशात सैनिकांचे मनोबल टिकून रहाण्यासाठी त्यांना शस्त्रास्त्रे आणि धान्य यांचा कोणताही तुटवडा पडू दिला जात नसून तेथे सैनिकांसाठी ‘ऑक्सिजन स्टेशन’ही उभारण्यात आले आहे. ‘पीएल्सी – १८१ मोबाईल हॉवित्झर’ तोफा या ५२ ‘कॅलिबर’च्या आहेत. या तोफांनी ‘लेझर’ आणि ‘सॅटेलाइट’ या माध्यमांतून लक्ष्याचा अचूक वेध घेतला जाऊ शकतो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now