ऑस्ट्रिया, युरोप येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. शारलोते सेंतकेरेस्ती (वय ११ वर्षे) हिची पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली  गुणवैशिष्ट्ये !

पू. (सौ.) योया वाले
कु. शारलोते सेंतकेरेस्ती

‘३ ते १० जानेवारी २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. कु. शारलोते ही बालसाधिका तिच्या आईसमवेत आश्रमात आली आहे. शिबिरार्थींसाठी एका संतांचा मार्गदर्शनपर एक सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात शारलोते संतांना साधनेविषयी शंका विचारत होती. त्या वेळी तिची बोलण्याची पद्धत आणि तिचा आवाज दैवी असल्याचे जाणवले. तिच्या बोलण्यातून चैतन्य आणि आनंद प्रक्षेपित होत होता. तिची प्रत्येक कृती, म्हणजे चालणे, बोलणे किंवा साधकांना साहाय्य करणे, अतिशय दैवी आहे. तिच्यात अनेक दैवी गुण असून ते अगदी सहजतेने लक्षात येतात.’

– (पू.) सौ. योया वाले, एस्.एस्.आर्.एफ्., युरोप. (७.१.२०१९)

(कु. शारलोते सेंतकेरेस्ती ही महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालिका असून वर्ष २०१६ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती. आता तिची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.’ – संकलक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now