परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या साधनेमुळे साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांच्यातील आत्मचैतन्याचे बळ वाढणे

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

परात्पर गुरु पांडे महाराज

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगांतर्गत अष्टांग योगानुसार साधना सांगितली आहे. या माध्यमातून साधकांची स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी निरनिराळ्या सत्संगांच्या माध्यमांतून (आढावा सत्संग, स्वभावदोष निर्मूलन सत्संग इत्यादी) ते प्रयत्न करून घेत आहेत. बर्‍याच साधकांनी याचा लाभ करून घेऊन आत्मोन्नती (आध्यात्मिक उन्नती) करून घेतली आहे. साधकांमध्ये आत्मचैतन्याचे बळ वाढल्यामुळे ते निरनिराळ्या संकटांना निर्भयतेने सामोरे जात आहेत.’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.९.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF