हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यास सप्तऋषींचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ऋषि याग भावपूर्ण वातावरणात संपन्न !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, समवेत पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. वझेगुरुजी

रामनाथी, गोवा – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातील अनिष्ट शक्तींचे निर्दालन व्हावे आणि सप्तऋषींचे आशीर्वाद लाभावेत, यांसह साधकांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावेत, ऋषि ऋण फिटावे आणि हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होऊन पृथ्वीवरील सज्जन हिंदूंचे रक्षण व्हावे, गो-लोकातून आशीर्वाद मिळावेत, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ९ जानेवारी या दिवशी संतांच्या वंदनीय उपस्थितीत अन् भावपूर्ण वातावरणात ऋषि याग संपन्न झाला. सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते संकल्प करून करण्यात आलेल्या या यागाचे पौरोहित्य श्री. दामोदर वझेगुरुजी आणि सनातनचे अन्य पुरोहित यांनी केले. या वेळी कलश रूपातील कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्‍वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ ऋषि यांचे पूजन, तसेच मुख्य देवता म्हणून कश्यप ऋषि आणि त्यांच्या पत्नी अदिती यांचे पूजन करण्यात आले.

क्षणचित्र : कश्यप ऋषींच्या दिती आणि अदिती या दोन पत्नी होत. दितीपासून दैत्य निर्माण झाले, तर अदितीपासून आदित्य म्हणजे देव निर्माण झाले. देवतांची शक्ती आणि आशीर्वाद मिळावेत, यासाठी मुख्यदेवता म्हणून कश्यप ऋषि आणि त्यांची पत्नी अदिती यांचे पूजन करण्यात आलेे.


Multi Language |Offline reading | PDF