राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी समस्त हिंदु संघटनांच्या वतीने श्रीरामनामदिंडी !

श्रीरामभक्तांचा करवीरनगरीत उद्घोष ‘एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम !’

श्रीरामाचे चित्र असलेल्या रथासह मार्गक्रमण करणारी दिंडी

कोल्हापूर, ९ जानेवारी (वार्ता.) – राममंदिर उभारण्यात येत असलेले विविध अडथळे दूर व्हावेत, सरकारला राममंदिर उभारण्यासाठी अध्यादेश काढण्यासाठी बळ मिळावे, यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने, तसेच समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ९ जानेवारी या दिवशी कोल्हापूर शहरात श्रीरामनामदिंडी काढण्यात आली. मिरजकर तिकटी येथून या दिंडीचा प्रारंभ झाला. दैवज्ञ बोर्डींग, खरी कॉर्नर, महाद्वार रस्ता, घाटी द्वार, संत गाडगे महाराज चौकमार्गे श्रीराममंदिर (श्रीमहालक्ष्मी मंदिर पूर्व द्वार) येथे या दिंडीची सांगता झाली. या वेळी राममंदिर उभारण्यात येत असलेले विविध अडथळे दूर होण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्रांना प्रार्थना आणि आरती करण्यात आली. या दिंडीत अग्रभागी श्रीरामचंद्रांचे चित्र असलेल्या छोट्या रथाचा समावेश होता आणि श्रीरामभक्त श्रीरामनामाचा जप करत होते. या दिंडीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थित होती. ९ जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारच्या दिंड्या, तसेच श्रीरामाला साकडे, सामूहिक आरती असे उपक्रम घेण्यात आले.

दिंडीत सहभागी श्रीरामभक्त

दिंडीचे या ठिकाणी करण्यात आले स्वागत !

खरी कॉर्नर येथे सौ. माधुरी दत्तात्रेय कुलकर्णी, बिनखांबी गणेशमंदिर येथे श्रीमती मंजुषा सौंदलगेकर आणि श्री. इंद्रजित सौंदलगेकर, श्री महालक्ष्मी मंदिर येथे श्री. सागर पोतदार, तर जोतिबा रस्ता येथे श्री. नीलेश सोनार यांनी दिंडीचे स्वागत केले.

क्षणचित्रे

१. सौ. रजनी कुलकर्णी (वय ६८ वर्षे) यांनी बसमधून जातांना दिंडी पाहिली. दिंडी पाहून त्या बसमधून उतरल्या आणि दिंडी संपेपर्यंत त्या चालत होत्या. ‘आज मला स्वर्गीय आनंद वाटला’, अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली.

२. या दिंडीचे फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याद्वारे २० सहस्रांपेक्षा अधिक लोकांपर्यंत या दिंडीचे वृत्त पोहोचले.

३. आजची दिंडी पाहून खूपच चैतन्यमय वाटले, खूपच अद्भुत वाटत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत होते.

४. या फेरीत महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. दिंडीत लावण्यात आलेल्या श्रीरामाच्या नामजपामुळे वातावरण ‘श्रीराममय’ झाले होते.

विशेष

१. दिंडी विविध मार्गांवरून पुढे पुढे जात असतांना अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वत:हून पूजा केली. रस्त्यावरच्या काही फुलवाल्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेला फुले अर्पण केली. तसेच रस्त्यावरील अनेक नागरिक दिंडी पाहून दिंडी आणि श्रीरामाची प्रतिमा यांना नमस्कार करत होते.

२. दिंडीच्या प्रारंभी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी मिरजकर तिकटी येथील राममंदिरात जाऊन श्रीरामाला प्रार्थना केली.

या प्रसंगी एका भजनी मंडळातील महिला तेथे उपस्थित होत्या. या महिलाही काही काळ टाळ घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या.

३. दिंडींच्या समारोपप्रसंगी आरती चालू असतांना आजूबाजूच्या दुकानातील अनेक  दुकानदार त्यांच्या दुकानात हात जोडून आरती म्हणत होते.

आरती झाल्यावर ‘आज आरती ऐकून खूप छान वाटले’, अशी प्रतिक्रिया स्थानिक पोलिसांनी व्यक्त केली.

सरकारने तात्काळ कायदा करून राममंदिर उभारावे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘श्रीरामजन्मभूमी ही श्रीरामाचीच आहे’, यावर शिक्कामोर्तबही केले. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली न्यायव्यवस्था ‘राममंदिराचा खटला हा आमच्या प्राधान्यात नाही’, असे म्हणते. त्यामुळे हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ? सध्या श्रीरामाची मूर्ती एका कापडी तंबूत ठेवून तिची एकप्रकारे विटंबनाच केली जात आहे. या ठिकाणी भाविकांना कोणत्याही प्रकारे पूजा-अर्चा करता येत नाही. केंद्रात आणि उत्तरप्रदेश राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचेच पूर्ण बहुमतातील सरकार आहे. त्यामुळे राममंदिर उभारण्यासाठी संसदेत तात्काळ कायदा बनवून अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी समस्त हिंदु संघटनांच्या वतीने या वेळी केली. या वेळी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

राममंदिरासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी घेतलेला पुढाकार मनाला भावणारा ! – शरद माळी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

गेली ७० वर्षे राममंदीर होण्यासाठी न्यायालयीन, तसेच विविध मार्गांनी हिंदू प्रयत्नशील आहेत. अशा वेळी या लढ्याला आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी घेतलेला पुढाकार मनाला भावणारा आहे, तरी सरकारने हिंदूंच्या भावनांची नोंद घेऊन लवकरात लवकर श्रीराम मंदिराची उभारणी करावी.

आतापर्यंत राममंदिरासाठी सरकारने काही केले नाही. ही दिंडी पाहून सनातन संस्था काहीतरी करेल, अशी आशा निर्माण झाली आहे ! – एका श्रीरामभक्ताची प्रतिक्रिया

उपस्थित मान्यवर : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. बबन लगारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. धर्माजी सायनेकर-भोसले (सर), गजानन महाराज मंदिराचे पुजारी श्री. पांडुरंग पाटील, केर्ली येथील शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. भीमराव पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now