लव्ह जिहाद रोखा अन्यथा देशातील प्रत्येक शहरात पाकिस्तान निर्माण होतील ! – भाजपचे आमदार गुलाबचंद कटारिया, उदयपूर

लव्ह जिहादद्वारे हिंदु मुली पंक्चरवाल्यांसह (धर्मांधांसह) पळून जात असल्याविषयी चिंता व्यक्त

  • भाजपचा एक नेता लव्ह जिहाद रोखण्याचे आवाहन करतो, तर त्याच पक्षाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे ‘लव्ह जिहाद म्हणजे काय, हे मला ठाऊक नाही !’, असे खोचक आणि हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान करतात ! अशांना गृहमंत्रीपदी बसण्याचा अधिकार तरी आहे का ?
  • स्वपक्षाच्या नेत्याला अशी मागणी करावी लागणे भाजपला लज्जास्पद !
  • साडेचार वर्षांत लव्ह जिहाद रोखू न शकणारा भाजप आणि पूर्वी त्यास एक प्रकारे राजाश्रय देणारी काँग्रेस यांच्यात भेद तो काय ? लव्ह जिहादपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

जयपूर (राजस्थान) – लव्ह जिहाद रोखा अन्यथा देशातील प्रत्येक शहरात पाकिस्तान निर्माण होतील, असे विधान भाजपचे राजस्थानमधील माजी मंत्री तथा उदयपूर येथील विद्यमान आमदार गुलाबचंद कटारिया यांनी केले. उदयपूर येथील वल्लभनगर ब्लॉकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कटारिया यांच्या भाषणाची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहे.

यात आमदार कटारिया पुढे म्हणाले की,

१. ‘लव्ह जिहाद’मुळे मुली ‘पंक्चरवाल्यां’समवेत  (धर्मांधांसह) पळून जात आहेत. त्यामुळे लोकांना कुटुंब आणि तरुण मुली यांच्या रक्षणासाठी घर सोडून जावे लागत आहे. यातून वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. असाच वेग राहिला, तर आधीच पाकिस्तान बनला आहे, आता प्रत्येक शहरात पाकिस्तान निर्माण होईल. वेळीच जागे होण्याची आवश्यकता आहे.

२. हा धोका लक्षात घेऊन हिंदूंनी संपूर्ण शक्तीनिशी एकत्र यायला हवे. आपण सर्व रामाचे पुत्र आहोत. जात आणि धर्म विसरून जा. ‘राम’ हाच आपला धर्म आणि जात आहे. आपण जेव्हा मरतो, तेव्हाही ‘राम-राम’ म्हणतो आणि एकमेकांना भेटतो तेव्हाही ‘राम-राम’ याच शब्दाचा उपयोग करतो.

३. जुन्या जयपूरला भेट दिली, तर तेथील मंदिरांमधील देवतांच्या मूर्तींच्या डोळ्यांमध्ये अश्रू दिसतील; कारण तेथील मंदिरातील मूर्तींची सेवा होत नाही. तेथील काही लोक मंदिरांत मांस आणि हाडे फेकत असल्याने मंदिरांत कोणत्याही धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन होऊ शकत नाही.


Multi Language |Offline reading | PDF