सनातनच्या रामनाथी आश्रमात कबुतरांनी घर करण्यामागील आध्यात्मिक कारणे !

‘काही दिवसांपासून सनातनच्या रामनाथी आश्रमात काही कबुतरांनी विविध दिशांना असणार्‍या खिडक्यांच्या वरील तावदानांवर आणि पन्हाळींमध्ये घरटी बनवली आहेत. कबुतरांनी अकस्मात सनातनच्या रामनाथी आश्रमात येऊन घरटे बनवण्यामागील आध्यात्मिक कारण पुढीलप्रमाणे आहेत.

कु. मधुरा भोसले

१. सध्या ७ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास देण्यासाठी साधकांवर करणी करणे, जादूटोणा करणे आणि मूठ मारणे यांसारखे अघोरी प्रकार करत आहेत. कबुतरांमध्ये वातावरणातील त्रासदायक स्पंदने खेचून घेण्याची क्षमता असल्यामुळे सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या साधकांवर केलेल्या अघोरी कर्मांचा दुष्परिणाम साधकांवर होत नाही. त्यामुळे साधकांचे रक्षण होते. (गेल्या वर्षी साधकांचा त्रास स्वत:वर घेतल्यामुळे आश्रमाच्या परिसरात एक कबूतर मरून पडले होते.)

२. कबुतरे एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. या आवाजामुळे वास्तूमध्ये कार्यरत असणारी त्रासदायक स्पंदने नष्ट होतात.

३. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर पाताळातील वाईट शक्ती विविध दिशांनी सूक्ष्मातून आक्रमणे करतात. आश्रमाच्या इमारतीत कबुतरांनी विविध दिशांना त्यांची घरटी बांधल्यामुळे सर्व दिशांतून होणार्‍या वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून आश्रमात रहाणार्‍या साधकांचे रक्षण होत आहे.

कृतज्ञता !

‘ईश्‍वरा, तू साधकांचे रक्षण करण्यासाठी कबुतरांना आश्रमात पाठवलेस आणि त्यांच्या संदर्भातील वरील सूक्ष्मातील माहिती आम्हाला दिलीस, यासाठी तुझ्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच अपुरे आहेत.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०१८, रात्री १०.४४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF