अरुणाचल प्रदेशमधून पाकिस्तानी हेरास अटक

पाकिस्तानी हेरांचा सुळसुळाट असलेला भारत ! एकामागोमाग एक सापडणार्‍या हेरांवरून देशाच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे, हे स्पष्ट होते. सरकार देशद्रोह्यांना जन्माची अद्दल घडवत नसल्याने असे हेर निर्माण होतात, हे सरकारला लज्जास्पद होय !

इटानगर – सैन्याच्या गुप्तचर पथकाने अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळून एका पाकिस्तानी हेरास अटक केली. निर्मल राय असे त्याचे नाव असून तो आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पूर्वी सैन्यदलात सुरक्षा कर्मचारी म्हणून कामाला होता. सैन्याने राय यास पोलिसांकडे सोपवले असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. राय याच्या भ्रमणभाषमध्ये सैन्यदलाशी संबंधित संवेदनशील माहिती आणि कागदपत्रे आढळून आली.

प्राथमिक चौकशीत राय हा दुबईस्थित एक महिला आणि एका व्यक्ती यांच्या  संपर्कात होता. या व्यक्तीने राय याची पाकच्या आयएस्आयचा हस्तक म्हणून नियुक्ती केली. त्याला सांगण्यात आल्यानुसार त्याने सैन्यदलातील नियुक्त्या, शस्त्रे, ठिकाणे आदींविषयींची संवेदनशील माहिती या व्यक्तीकडे पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.


Multi Language |Offline reading | PDF