आंध्रप्रदेशमधील माघ मेळ्यासाठी रेल्वे आणि बस यांच्या तिकिटांमधील दरवाढ रहित करण्याची हिंदूंची मागणी !

आज हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमांतून, तसेच निवेदने सादर करून सनदशीर मार्गाने आणि व्यापक स्वरूपात वाचा फोडली जात आहे.

गोदावरी नदीच्या तटावर वर्ष २०१८ मध्ये भरलेला पुष्करालू येथील मेळा

आंध्रप्रदेशमध्ये प्रत्येक वर्षी माघ मासात ‘माघ मेळा’ भरतो. त्यास लाखो हिंदु भाविक भेट देतात. या मेळ्याच्या निमित्ताने आंध्रप्रदेश सरकारने रेल्वे आणि बस यांच्या तिकिटांमध्ये दरवाढ केली आहे. या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना जागोजागी स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा जिल्हाधिकारी यांना या संदर्भातील मागण्यांचे निवेदन देत आहेत. सदर निवेदन येथे देत आहोत.

दिनांक : . १.२०१९

प्रती,

मा. परिवहन मंत्री, आंध्रप्रदेश

मा. रेल्वेमंत्री, केंद्र सरकार, देहली.

विषय : रेल्वे आणि बस यांच्या तिकिटांमधील दरवाढ, तसेच ‘प्लॅटफॉर्मच्या तिकीटां’मध्ये होणारी दरवाढ त्वरित रहित करण्याविषयी….

महोदय,

माघ मेळा हा हिंदूंच्या सर्वांत मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी माघ मासात म्हणजेच मकरसंक्रांतीपासून ते महाशिवरात्रीपर्यंतच्या काळात पुष्करालू (मराठीत ‘पुष्कर’) मेळ्यासाठी लाखो भाविक श्रद्धेने येत असतात. या निमित्ताने आंध्रप्रदेश सरकारने वाहतूक व्यवस्थेत अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

१. आंध्रप्रदेश येथील साऊथ सेंट्रल रेल्वे प्रशासनाने मकरसंक्रांतीच्या काळातील गर्दी आणि शबरीमला येथील भाविकांची गर्दी, यांमुळे ‘प्लॅटफॉर्म तिकिट’ १० ते २० रुपयांनी वाढवले आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे आणि बसगाड्या यांची व्यवस्था करण्यात येणार असून यांच्यासाठी अनुमाने ३० ते ५० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

२. सरकार एकीकडे हज येथे धार्मिक यात्रा करण्यासाठी मुसलमान बांधवांना शेकडो कोटी रुपयांची सवलत देत अल्प खर्चात विमानप्रवासाची सोय, विशेष वैद्यकीय सुविधा आणि त्यांना सरकारी खर्चाने पर्यायाने बहुसंख्यांक हिंदूंच्या कररूपाने जमा झालेल्या पैशाने ‘हज हाऊस’ बांधून देते. दुसरीकडे हिंदूंच्या सणांच्या आणि धार्मिक उत्सवांच्या काळात अशी भाडेवाढ करणे, अधिभार लावणे असे प्रकार केले जात आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.

३. ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवल्या जाणार्‍या या शासनप्रणालीत सर्व धर्मांना समान न्याय मिळावा, असे अपेक्षित असतांना हिंदूंच्या संदर्भात मात्र नेहमी भेदभाव केला जातो, परिणामी हिंदु समाजाच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होत आहे.

रेल्वे प्रशासन आणि राज्य परिवहन खाते यांनी घेतलेल्या या भाडेवाढीच्या निर्णयाचा लाखो भाविकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. हा निर्णय म्हणजे धार्मिक पक्षपात असून जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक उत्सवावर बंधने आणण्याचा प्रकार असल्याची भावना हिंदु समाजामध्ये निर्माण झाली आहे.

यासाठी आम्ही पुढील मागण्या करत आहोत –

१. माघ मेळ्याच्या निमित्ताने आंध्रप्रदेश सरकारने केलेली दरवाढ तातडीने मागे घ्यावी.

२. उत्सवस्थळी भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

३. भारतीय नागरिकांना धर्माच्या आधारे नव्हे, तर समान सुविधा मिळाव्यात, समान अधिकार मिळावेत, यासाठी देशात ‘समान नागरी कायदा’ लागू करावा.

आपला नम्र,

हिंदु धर्माभिमान्यांना आवाहन !

या निवेदनाची प्रत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी हिंदू आपल्या शहरातील/गावातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी यांना देऊ शकतात. या निवेदनाची प्रत पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे – https://www.hindujagruti.org/hindi/hjs-activities/rashtriya-hindu-andolan.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now