उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हनुमंताकडून राममंदिराची पहिली वीट रचण्याची आज्ञा मिळाली आहे ! – महंत धर्मदास महाराज, रामजन्मभूमी खटल्याचे पक्षकार

प्रयागराज (कुंभनगरी), ८ जानेवारी (वार्ता.) – ‘उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हनुमंताकडून राममंदिराची पहिली वीट ठेवण्याची आज्ञा मिळाली आहे. त्यांच्या कार्यकाळात राममंदिराची उभारणी निश्‍चित होईल’, असा आशावाद रामजन्मभूमी खटल्याचे पक्षकार तथा श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे श्री महंत धर्मदास महाराज यांनी व्यक्त केला. (राममंदिराची पहिली वीट कधी रचली जाणार ?, हे हिंदूंना कळले पाहिजे; कारण इतकी वर्षे ‘राममंदिर आम्हीच उभारू’, असे आश्‍वासन ऐकून हिंदू कंटाळले आहेत ! – संपादक )

नुकतीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभनगरी प्रयागराज येथे भेट दिली. त्या वेळी त्यांनी वैष्णव आणि शैव आखाडे यांतील साधू-संतांशी चर्चा केली. त्यानंतर महंत धर्मदास महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘निर्वाणी आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी ‘राममंदिराची उभारणी आम्ही संतांच्या समवेत राहून करणार आहोत’, असे आश्‍वासन आम्हाला दिले आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF