हज यात्रेकरूंची यात्रा सुरक्षित व्हावी, हाच राज्यशासनाचा प्रयत्न आहे ! – विनोद तावडे

भाजप सत्तेत असतांना एकीकडे कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे तिकिटावरील अधिभार रहित करण्याची हिंदूंना मागणी करावी लागते, तर दुसरीकडे हज यात्रेकरूंसाठी लोकप्रतिनिधी स्वत:हून पायघड्या घालतात !

मुंबई – उत्तरप्रदेश राज्यानंतर महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी सर्वाधिक यात्रेकरू पाठवण्यात येत असून त्यांची यात्रा सुरक्षित व्हावी, हाच राज्यशासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती अल्पसंख्याकमंत्री विनोद तावडे यांनी दिली. हज हाऊस येथे लॉटरी सोडत कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. हज वर्ष २०१९ साठी महाराष्ट्रातून एकूण ३५ सहस्र ६६६ इतक्या अर्जदारांकडून अर्ज प्राप्त झाले असून एकूण ९ सहस्र ६२२ हज यात्रेकरूंसाठी लॉटरी काढण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF