मुदतबाह्य औषधसाठा केल्याच्या प्रकरणी साहाय्यक पशूवैद्यकीय अधिकारी दोषी

अशांवर सरकार कठोर कारवाई करणार का ?

रत्नागिरी – खाडीपट्ट्यातील तुंबाड गावासह पंचक्रोशीतील गावांसाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या पशूवैद्यकीय विभागाच्या वतीने पशूवैद्यकीय रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकर्‍यांच्या दुभत्या जनावरांसह शेळी आणि जनावरे यांचे संवर्धन, तसेच विविध आजारांचे निदान करण्यासाठी शासनाकडून पुरवण्यात येणार्‍या लाखो रुपयांच्या औषधांचा साठा करून त्याची विक्री करत मुदतबाह्य औषधसाठा केल्याप्रकरणी तुंबाड येथील साहाय्यक पशूधन अधिकारी आर्.एस्. जाधव दोषी असल्याचे चौकशी अहवालाअंती स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे. यासह लसीकरणासाठीही औषधे पुरवली जात होती; मात्र ही औषधे तुंबाड येथील गुरांच्या दवाखान्यात न नेता शिव फाटा येथे भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या गाळ्यामध्ये साठा करून ठेवली होती. मुदतबाह्य साठा करून ठेवण्यात आलेल्या औषधांची दुर्गंधी येऊ लागल्याने ग्रामस्थांनी संशय व्यक्त करत या संदर्भात पशूवैद्यकीय अधिकार्‍यांकडे रितसर तक्रारी दाखल केल्या होत्या. याविषयीचा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला होता. (संदर्भ संकेतस्थळ : तरुण भारत)


Multi Language |Offline reading | PDF