५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मंगळूरू येथील चि. चरणदास रमानंद गौडा (वय ५ वर्षे) !

चि. चरणदास गौडा

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. चरणदास रमानंद गौडा हा एक आहे !

(‘वर्ष २०१६ मध्ये चि. चरणदास गौडा याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

१८.१२.२०१८ या दिवशी सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांचा पुत्र मंगळूरू येथील सेवाकेंद्रात रहाणारा चि. चरणदास गौडा याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याची आई आणि मंगळूरू सेवाकेंद्रातील साधक यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ.‘चरणदास सतत आनंदी असतो.

१ आ. व्यवस्थितपणा : तो खेळणी, शाळेची पुस्तके आणि दप्तर व्यवस्थित ठेवतो.’ – कु. रूपा

१ इ. नम्रता : ‘त्याची बोलण्याची शैली चांगली आहे. तो नम्रतेने बोलतो. त्याला काही हवे असल्यास तो त्याविषयी प्रेमाने विचारतो.

१ ई. चरणदासचे बोलणे ऐकून ‘त्याचे मन निर्मळ आहे’, असे जाणवते.’- सौ. संगीता चौधरी

१ उ. जवळीक साधणे : ‘तो सेवाकेंद्रात नवीन आलेल्या व्यक्तींशी स्वतःहून बोलतो. तो त्यांच्याशी सहजतेने संवाद साधतो.’ – कु. रूपा आणि सौ. संगीता चौधरी

१ ऊ. प्रेमळ

१. ‘पू. भार्गवराम प्रभु यांच्याशी खेळतांना चरणदास त्यांना मोठ्या भावाप्रमाणे सांभाळतो. ‘ते सूक्ष्मातून एकमेकांशी बोलतात’, असे मला वाटते.’ – सौ. भवानी प्रभु

२. ‘एकदा सेवाकेंद्राच्या आवारात एक मांजर तिच्या पिल्लांना सोडून गेली होती. पिल्लांना भूक लागते; म्हणून चरणदास शाळेतून येताच त्यांना दूध पाजण्याचा प्रयत्न करत असे. चरणदास आणि गुरुदास या दोघांनी त्या पिल्लांना दूध प्यायला शिकवले. ‘पिल्लांची आई परत आली पाहिजे’, या त्यांच्या इच्छाशक्तीमुळे ३ दिवसांनंतर पिल्लांची आई परत आली.’ – सौ. मंजुळा गौडा (आई) आणि सौ. भवानी प्रभु

३. ‘माझा भाचा (बहिणीचा मुलगा कु. नंदन) रामनाथी येथील आश्रमात असतो. मी रामनाथी आश्रमातून मंगळूरू सेवाकेंद्रात गेल्यावर चरणदास मला ‘नंदन कसा आहे ? तो शाळेत जातो ना ? तो शाळेतून परत कधी येतो ?’, असे विचारतो.’ – सौ. संगीता चौधरी

१ ए. इतरांचा विचार करणे

१. ‘एक दिवस दमल्यामुळे मी खोलीत झोपले होते. तेव्हा चरणदास माझ्याकडे कशाय मागण्यासाठी आला. मी त्याला सांगितले, ‘‘मी दमले आहे. तू स्वयंपाकघरातील ताईंना विचार.’’ तेव्हा हट्ट न करता तोे लगेच स्वयंपाकघरात गेला.’ – कु. आशा हिरेमठ

२. ‘पू. भार्गवराम झोपले असतांना चरणदास आल्यास तो त्यांना लांबूनच पाहून परत जातो. तेव्हा त्याच्या डोळ्यांत प्रेमभाव दिसतो.’ – सौ. भवानी प्रभु

१ ऐ. शिकण्याची वृत्ती

१. ‘चरणदास हिंदी आणि कोकणी या भाषांत बोलण्याचा प्रयत्न करतो. तो पू. भार्गवराम यांच्याशी कोकणी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो.’ – सौ. मंजुळा गौडा

२. ‘साधकांना सेवा करतांना पाहून तोही सेवा शिकण्याचा प्रयत्न करतो.

१ ओ. ऐकण्याची वृत्ती : तो खेळत असतांना त्याला ‘खेळण्याची वेळ संपली. आता तू नामजप करायला जा’, असे सांगताच तो तत्परतेने नामजप करायला बसतो.’

– सौ. वनिता मोगेर

१ औ. साधकांशी त्यांच्या भाषेत बोलणे : ‘त्याचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. तो अन्य साधकांशी तुळु भाषेत बोलतो; मात्र तो माझ्याशी कन्नड भाषेत बोलतो. (मला तुळू भाषा येत नाही.)’ – कु. आशा हिरेमठ

१ अं. सतर्कता : ‘पू. रमानंदअण्णांनी गुरुदासला १ घंटा आश्रमसेवा करायला सांगितली होती. पू. अण्णा दुसर्‍या जिल्ह्यात गेले असतांना एकदा मी त्यांना ‘गुरुदास आता २ घंटे आश्रमसेवा करतो’, असे सांगितले. तेव्हा तिथेच झोपलेल्या चरणदासने तत्परतेने उठून ‘त्याने आश्रमसेवा केली; परंतु शाळेचा गृहपाठ अजूनही केला नाही,’ असे सांगितले.’ – कु. रूपा

१ क. खेळायला न जाता नामजप करणे : ‘तो एक दिवस नामजप करतांना एका साधकाने त्याला विचारले, ‘‘गुरुदास खेळत आहे. तू खेळायला का जात नाहीस ?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘माझा नामजप करायचा राहिला आहे.’’ – कु. आशा हिरेमठ

१ ख. सेवाभाव : ‘त्याला कुणी सेवा सांगितल्यास तो ती तत्परतेने करतो. तो सेवाकेंद्रातील सामूहिक स्वच्छतेत उत्साहाने सहभागी होतो. तो सेवाकेंद्राच्या बाहेरच्या अंगणातील केर काढतांना साहाय्य करतो. तो पू. रमानंदअण्णांच्या खोलीतील केर लांब अंतरावरील कचराकुंडीत टाकतो. – कु. रूपा

१ ग. कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे : आम्ही त्याला काही करायला सांगितल्यास तो ते तत्परतेने करतो. तेव्हा आम्ही ‘चरणदासने छान केले’, असे म्हटल्यावर तो ‘मला गुरुदेवांनी आशीर्वाद दिला’, असे सांगतो.’ – कु. रूपा

१ घ. रामनाथी आश्रमात जाण्याची ओढ : ‘एक दिवस तो काही हिंदी शब्द बोलला. तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘‘तू आता रामनाथी आश्रमात जाऊ शकतोस. तुला हिंदी बोलता येते.’’ त्या वेळी तो मला म्हणाला, ‘‘मलाही ‘रामनाथी आश्रमात जावे’, असे वाटते.’’ – सौ. भवानी प्रभु

१ च. भाव

१. ‘तो प्रतिदिन शाळेत जातांना ध्यानमंदिरात जाऊन गुरुदेवांना नमस्कार करतो. एखाद्या दिवशी तो नमस्कार करण्याचे विसरल्यास त्याला पश्‍चाताप होतो. त्या वेळी ‘मी ध्यानमंदिरात जायचे विसरलो’, असे तो साधकांना पुनःपुन्हा सांगतो.

२. तो पू. अण्णांच्या खोलीत असलेले श्रीकृष्णाचे चित्र आणि गुरुदेवांचे छायाचित्र यांना वाहाण्यासाठी फुले आणून देतो.

३. पू. भार्गवराम यांची पुष्कळ दिवस भेट न झाल्यास तो त्यांचे चलत्चित्र (व्हिडिओ) पहातो.

४. आम्ही घराविषयी काही बोलल्यास ‘आपले घर हा आश्रमच आहे ना !’, असे तो सांगतो.’ – कु. रूपा

१ छ. ‘चरणदासला पाहिल्यावर तो ‘पू. रमानंदअण्णांची प्रतिकृती आहे’, असे मला वाटते.

२. अनुभूती

२ अ. चरणदास पू. भार्गवराम यांच्यावर प्रेम करत असतांना ‘ते एकमेकांचे चैतन्य वाटून घेत आहेत’, असे मला वाटते.’ – सौ. भवानी प्रभु

२ आ. ‘चरणदासच्या गुणवैशिष्ट्यांचे टंकलेखन करतांना मला सुगंधाची अनुभूती आली.’ – सौ. माधुरी इनामदार

३. स्वभावदोष

‘हट्टीपणा आणि अव्यवस्थितपणा’ – सौ. मंजुळा गौडा

(डिसेंबर २०१८)


Multi Language |Offline reading | PDF