(म्हणे) ‘ममता बॅनर्जी पंतप्रधान होण्याविषयीचे विधान मी गंमतीने केले !’ – भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची सारवासारव

असे गांभीर्य नसलेले नेते भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बनतात, हे लक्षात घ्या !

असे नेते एक दिवस भाजपला निश्‍चित बुडवतील, यात शंका नाही !

कोलकाता – ममता बॅनर्जी पंतप्रधान होण्याविषयीचे विधान मी गंमतीने केले होते. माझे विधान कोणीही गंभीरपणे घेऊ नये, अशी सारवासारव भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली.

घोष यांनी नुकतेच ममता बॅनर्जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना ‘ममता बॅनर्जी यांना निरोगी रहाण्याची नितांत आवश्यकता आहे; कारण त्या एकमेव अशा व्यक्ती आहेत की, ज्यांना ‘पहिल्या बंगाली पंतप्रधान’ म्हणून संधी मिळू शकते. बंगालींमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ममता बॅनर्जी सर्वांत पुढे आहेत’, असे विधान केले होते. यावर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ‘घोष यांच्या विधानावरून तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात छुपे संबंध असल्याचे उघड झाले’, अशी टीका केली. यानंतर घोष यांनी ‘मी हे वक्तव्य गंमतीने केले असून मी ममता बॅनर्जी यांना केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत’, असे सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now