इस्लाम पंथात चिनी संस्कृतीच्या मूल्यांचा समावेश करण्यासाठी चीन सरकारने केला नवा कायदा !

  • कुठे कट्टरतावाद रोखण्यासाठी थेट इस्लाम पंथात हस्तक्षेप करून त्यात चिनी संस्कृती रूजवणारा कायदा करणारा बाणेदार चीन, तर कुठे मदरशांतील कट्टरतावाद उघड होऊनही त्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देणारे कणाहीन भाजप सरकार !
  • चीनच्या अशा कणखर भूमिकेमुळेच तेथे आतंकवादी आक्रमणाच्या घटना घडत नाहीत, हे भारतीय शासनकर्ते जाणतील, तो सुदिन !

बीजिंग – इस्लाम पंथात चिनी संस्कृतीच्या मूल्यांचा समावेश करण्यासाठी चीन सरकारकडून नवा कायदा करण्यात आला आहे, अशी माहिती चीनमधील सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने दिली. या नव्या कायद्यानुसार पुढील ५ वर्षांत इस्लाम पंथात चिनी संस्कृतीच्या मूल्यांचा समावेश होईल. या कायद्यात इस्लामच्या ‘सिनिसायजेशन’ (कुठल्याही गोष्टीचे चिनीकरण करणे) हे सूत्र अधोरेखित करण्यात आले आहे. सरकारने ८ मुसलमान संस्थांशी चर्चा करून हा कायदा बनवला असल्याचा दावा चीनने केला आहे. या चर्चेत ‘मुसलमान पंथाचे चिनीकरण झाले पाहिजे’, यावर सर्वांचे एकमत झाले.


Multi Language |Offline reading | PDF