भारताला ‘इस्लामिक राष्ट्र’ बनवण्याचे धर्मांधांचे स्वप्न कदापि साकार होणार नाही ! – आमदार टी. राजासिंह, भाजप

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा !

नांदेड, ८ जानेवारी (वार्ता.) – वर्ष २०१२ मध्ये नांदेड शहरातील ५ आतंकवाद्यांनी मला ठार मारण्याचे नियोजन केले होते; परंतु राष्ट्र्रीय तपास यंत्रणेने त्यांना कह्यात घेतले. भारतातील काही धर्मांध भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचे स्वप्न पहात आहेत; पण हा देश हिंदूंचा असल्याने त्यांचे स्वप्न कदापि साकार होणार नाही, असा घणाघात भाजपचे आमदार, तसेच श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांनी केला. ते ६ जानेवारी या दिवशी येथील नवा मोंढा मैदानात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती लाभलेल्या या सभेला सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांच्या जाज्वल्य वक्तव्यांनी उपस्थितांमध्ये धर्मचेतनेचे स्फुलिंग चेतवले.

भारतात ‘भगवी त्सुनामी’ येण्याची आवश्यकता असल्याचे आमदार टी. राजासिंह यांचे प्रतिपादन

१. नांदेडमध्ये गोहत्या वाढली असून मोठ्या प्रमाणावर गोमांस निर्यात केले जात आहे. शहरातील रस्त्यांवर नमाजपठण केले जाते. रेल्वे स्थानकावर हिंदूंना रिक्शा लावण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे त्यांना स्थानकापासून दूर अंतरावर उभे रहावे लागते. यावरून असा प्रश्‍न पडतो की, नांदेड हिंदुस्थानात आहे कि पाकिस्तानात ?

२. शहरातील ‘मसाज केंद्रा’च्या नावाखाली हिंदु तरुणी आणि महिला यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जात आहे. हिंदू तरुणींच्या संपत्तीवर डोळा ठेवला जात आहे.

३. महापालिकेच्या वतीने शहरातील सांडपाणी पवित्र गोदावरी नदीत सोडले जात आहे.

४. असे असतांना हिंदु तरुण मात्र सामाजिक संकेतस्थळांमध्ये रममाण झाला आहे. या समस्यांना आळा घालण्यासाठी भारतात ‘भगवी त्सुनामी’ येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येकाने धर्माचरण करून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी सिद्ध व्हा !

५. बाबरने जेव्हा राममंदिर पाडले, तेव्हा कोणाची अनुमती घेतली होती का ? मग शेकडो वर्षे रामभक्त राममंदिराच्या प्रतीक्षेत असतांना कोणाच्या अनुमतीची काय गरज ? राम मंदिर जर लवकर उभे राहिले नाही, तर कोट्यवधी हिंदू स्वयंस्फूर्तीने राममंदिराची उभारणी करतील.

 राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी दिवसातून ५ वेळा श्रीकृष्णाला प्रार्थना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

धर्माचरण आणि साधना केल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री भवानीदेवीचा आशीर्वाद प्राप्त झाला. त्यामुळेच त्यांनी पाच इस्लामी पातशाह्यांचा निःपात करून धर्मरक्षणाचा आदर्श आपल्यापुढे ठेवला.  सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. आपणही दिवसातून ५ वेळा ‘हे श्रीकृष्णा, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण कर’, अशी प्रार्थना करावी.

हिंदूंनी हिंदु राष्ट्र्र स्थापन केल्याविना स्वस्थ बसू नये ! – सुनील घनवट

हिंदु राष्ट्र-जागृती सभेला नांदेड येथील काही मुसलमान संघटनांनी निवेदन देऊन विरोध दर्शवला. यावरून धर्मांध कशा प्रकारे संघटित आहेत, हे लक्षात येते. उल्हासनगर (ठाणे) येथे दीड लाख लोकांचे धर्मांतर झाले. गुरु गोविंदसिंग, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेवायला हवा. आतंकवादी याकूबसाठी रात्री १ वाजता न्यायालयाची दारे उघडली जातात; मात्र पद्मावत, केदारनाथ यांसारख्या हिंदुद्रोही चित्रपटांच्या विरोधात आणि राम मंदिराविषयी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली साधी तक्रारही नोंदवून घेतली जात नाही. कुठलाही आरोप सिद्ध झालेला नसतांना २८ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना कारावास भोगावा लागत आहे. त्यामुळे हिंदूंनीही हिंदु राष्ट्र्र स्थापन केल्याविना स्वस्थ बसू नये.

हिंदू तरुणींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन जिहादींचा सामना करून आपले शौर्य गाजवावे ! – कु. रागेश्री देशपांडे

हिंदुस्थान ही शौर्यभूमी आहे. हिंदू तरुणींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन जिहादींचा सामना करून आपले शौर्य गाजवले पाहिजे. आत्मसन्मान जपण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चालू करण्यात येणार्‍या निःशुल्क स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात महिलांनी प्रशिक्षण घ्यावे.

सभेची वैशिष्ट्ये

१. सभेपूर्वी भाजपचे आमदार टी. राजासिंह यांच्या हस्ते व्यासपिठावरील सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

२. वेदमूर्ती श्री. शंकर गुरुभाले मंजरथकर, श्री. गणेश गुरुमुळी रामपुरीकर यांनी वेदमंत्रपठण केले.

३. सभेच्या शेवटच्या टप्प्यात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध होण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.

४. ‘फेसबूक’च्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून ३८ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत सभेचा विषय पोहोचला.

क्षणचित्रे

१. नांदेड येथून अनुमाने १५० किलोमीटर अंतरावरील माहूर दत्ता शिखर येथून ह.भ.प. परमेश्‍वर महाराज उपस्थित होते.

२. वीज गेल्यानंतरही भ्रमणभाषच्या विजेरीद्वारे धर्मप्रेमी स्वत:हून अभिप्राय पत्रक मागून अभिप्राय भरून देत होते.

३. ‘लव्ह जिहाद आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयांवरील १३७ ग्रंथ वितरीत झाले.

४. पंजाबी समाजातील धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५.  ८० ते ९० वर्षांचे एक आजी-आजोबा थंडीने अंग थरथरत असतांनाही सभा संपेपर्यंत थांबले होते.

६. सभास्थळी सुरक्षेसाठी २ बाजूंना मेटल डिटेक्टर बसवले होते.

सभेनंतरच्या आढावा बैठकीसाठी २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. त्यांनी सामाजिक संकेतस्थळे आणि राष्ट्रीय हिंदू आंदोलन यांत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. काहींनी गावातील लव्ह जिहादविषयक समस्यांचे शंकानिरसन करवून घेतले.

विशेष सहकार्य

श्री पाचलेगावकर महाराज यांच्या मुक्तेश्‍वर आश्रमाचे विश्‍वस्त श्री. सुधाकर टाक आणि त्यांचे सहकारी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे निवास अन् भोजन यांची सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली.


Multi Language |Offline reading | PDF