(म्हणे) ‘१० सहस्र खोल्यांमधील कुठल्या खोलीत श्रीराम जन्माला आले, ते कसे कळणार ?’

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांचे हिंदुद्वेषी फुत्कार

  • समस्त हिंदू असे भव्य हिंदु राष्ट्र निर्माण करतील की, मणिशंकर अय्यर यांच्या पुढच्या पिढ्यांना ‘या पृथ्वीवर मणिशंकर अय्यर आणि काँग्रेस यांचे अस्तित्व कुठल्या देशात होते’, तेही कळणार नाही !
  • वैचारिक सुंता झालेला एक फुटकळ माणूस भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करूनही त्याच्यावर कारवाई न करणे भाजप सरकारला लज्जास्पद ! असे सरकार म्हणे हिंदुत्वनिष्ठ ! हिंदूंनो, हिंदुद्वेषाने पछाडलेल्या अय्यर यांना अटक होण्यासाठी आता कंबर कसा !
‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक शाम बाबरी मस्जिद के नाम’

नवी देहली – राजा दशरथाच्या महालात १० सहस्र खोल्या होत्या. त्यामुळे श्रीराम कोणत्या खोलीत जन्माला आले, ते कसे कळणार ?, असे हिंदुद्वेषी विधान काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केले. येथे ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक शाम बाबरी मस्जिद के नाम’, या कार्यक्रमात ते बोलत होते.

अय्यर पुढे म्हणाले, ‘‘तुमची इच्छा आहे, तर तुम्ही अयोध्येत राममंदिर अवश्य बांधा. ‘मंदिर वही बनाएंगे’, असे कसे म्हणू शकता ? ‘मंदिर वही बनाएंगे’, या वाक्याचा अर्थ काय आहे ? राजा दशरथ यांच्या महालात १० सहस्र खोल्या होत्या. त्यामुळे कोणाला सांगता येईल का की, कोणती खोली कुठे होती; मात्र आज केवळ समज असल्याने अयोध्येत उभी असलेली मशीद उद्ध्वस्त करून तेथे राममंदिर उभारण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत.’’


Multi Language |Offline reading | PDF