शैक्षणिक वर्ष संपतांना महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

नवी मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार !

नवी मुंबई – चालू शैक्षणिक वर्षासाठी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना ८ कोटी ११ लाख रुपयांच्या गणवेश खरेदीला ८ जानेवारी या दिवशी स्थायी समितीने मान्यता दिली. शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी केवळ ३ मास शेष असतांना गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे नव्हे का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF