राममंदिर खटल्यासाठी ५ सदस्यीय घटनापिठाची स्थापना : १० जानेवारीला सुनावणी

नवी देहली – राममंदिराच्या खटल्यावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापिठाची स्थापना करण्यात आली आहे. या पिठासमोर १० जानेवारीला अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या घटनापिठात न्यायमूर्ती एस्.ए. बोबडे, न्यायमूर्ती एन्.व्ही. रामाणा, न्यायमूर्ती यू.यू. ललित आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF