मुंबई येथे बेस्टचे ३० सहस्र कर्मचारी संपावर गेल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल !

प्रत्येक वेळी जनतेला वेठीस धरणे हा समाजद्रोहच !

मुंबई – प्रशासनाशी विविध मागण्यांवर चालू असलेल्या चर्चेतून समाधानकारक तोडगा निघू न शकल्याने बेस्टचे अनुमाने ३० सहस्र कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे कामावर जाणार्‍या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रिक्शा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांची लूट केली. ८ जानेवारीला एकही बस डेपोतून बाहेर पडलेली नव्हती. बेस्ट प्रशासनाकडून याआधीच संपात सहभागी झालेल्यांच्या विरोधात ‘मेस्मा’ लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संपकर्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बेस्ट कामगार सेनेने या संपात सहभागी होण्यास नकार दिला आहे. बेस्ट संपामुळे पश्‍चिम रेल्वे आणि मेट्रो यांनी अधिक फेर्‍या वाढवल्या तसेच एस्टीच्या एकूण ४० बसगाड्या सोडल्या असून ठाणे ते मंत्रालयापर्यंत १५ बसगाड्या धावत आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेत कामगार संघटनांसमवेत प्रशासनाची बैठक होणार आहे. त्याविषयीचे अंतिम वृत्त हाती आले नाही.


Multi Language |Offline reading | PDF