बांगलादेशातील जिहाद्यांकडून हिंदु मंदिरात तोडफोड

साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात पाक आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना वाचवण्यासाठी काहीही न करणारे केंद्रातील भाजप सरकार ‘आता काही करील’, या भ्रमात हिंदूंनी राहू नये ! जिथे भारतातील हिंदूंचे रक्षण होत नाही, तिथे बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? जगभरातील हिंदूंच्या रक्षणार्थ आता हिंदु राष्ट्रच हवे !

ढाका – बांगलादेशमधील तंगेल जिल्ह्यातील बात्रा गावामध्ये जिहाद्यांनी मंदिरात घुसून तोडफोड केली. तसेच या मंदिराची उभारणी करणारे श्री. चित्तरंजन यांच्या कुटुंबावर आक्रमण करून त्यांच्या घराची नासधूस केली. हे जिहादी स्थानिक धर्मांधांच्या साहाय्याने हिंदु मंदिराची भूमी बळकावण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी त्यांनी या मंदिरासह श्री. चित्तरंजन यांच्या घरावरही आक्रमण केले. चित्तरंजन यांनी अनुमाने २० वर्षांपूर्वी हे मंदिर बनवले होते.


Multi Language |Offline reading | PDF