जेएनयूतील श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमास विद्यार्थी संघटनेचा विरोध !

पूर्वी योगऋषी रामदेवबाबा यांच्या कार्यक्रमालाही केला होता विरोध !

आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या आणि संतांच्या मार्गदर्शनाला विरोध करणार्‍या विद्यापिठात आतंकवादी निपजले नाहीत, तरच नवल !

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएनयूमध्ये) एका कार्यक्रमासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांना निमंत्रित केल्याच्या निषेधार्थ या विद्यापिठातील साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेने ८ आणि ९ जानेवारी या दिवशी संप पुकारला आहे. (देशद्रोही घोषणा देण्यात येणार्‍या विद्यापिठातील विद्यार्थ्यांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा ! याविषयी मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना गप्प का ? – संपादक) श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमावर १३ लाख रुपये व्यय (खर्च) करण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनेचा आक्षेप आहे. यापूर्वी योगऋषी रामदेवबाबा यांच्या कार्यक्रमाला जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने विरोध केला होता.

विद्यार्थी संघटनेने काढलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, ‘‘एका अपंग विद्यार्थ्याला निधीअभावी शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यास कुलगुरूंनी नकार दिला होता. मग ते एका आध्यात्मिक गुरूंच्या कार्यक्रमासाठी एवढा व्यय कसा करू शकतात ? तसेच विद्यापीठ प्रशासनाने ग्रंथालयाच्या अंदाजपत्रकात ८० टक्के कपात केली आहे. काही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीही देण्यात आलेल्या नाहीत.’’ (या कार्यक्रमाला होणारा व्यय हे विरोध करण्यासाठी मिळालेले एक कारण आहे. मुळात साम्यवाद्यांना हिंदु धर्माविषयी द्वेष असल्यामुळे हिंदूंच्या संतांच्या कार्यक्रमाला ते विरोध करून हिंदूद्वेषाचा कंड शमवण्याचा प्रयत्न करत आहेत ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now