परात्पर गुरु पांडे महाराज यांना काही न विचारताच त्यांनी मनातील प्रश्‍नांची उत्तरे देणे

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मार्गदर्शक विचार

‘१८ आणि १९.२.२०१८ हे दोन दिवस मी अन् माझा मुलगा अथर्व देवद आश्रमात सेवेसाठी गेलो होतो. घरी जाण्यासाठी निघत असतांना माझ्या मनात ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांची भेट झाली नाही’, असा विचार येत होता. त्याच वेळी आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ आमची प.पू. पांडे महाराज यांच्याशी भेट झाली. त्या वेळी मी त्यांना काही न विचारताच त्यांनी माझ्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे दिली.

परात्पर गुरु पांडे महाराज

१. मुलाच्या अभ्यासाविषयी विचार मनात असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अभ्यासाविषयी मार्गदर्शन करणे

माझ्या मनात ‘अथर्व अभ्यास करत नाही, त्यासाठी काय करू’, असा प्रश्‍न होता. मी हा प्रश्‍न विचारण्याअगोदरच परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले, ‘‘अभ्यासाला बसतांना पूर्वेकडे तोंड करून बसायचे.’’ त्यांनी दिवसातून एकदा १ मंत्रजप १०८ वेळा म्हणण्यास सांगितला. ते म्हणाले, ‘‘अभ्यासाला एकाच जागी बसायचे म्हणजे आपली आसनसिद्धी होते. अभ्यास म्हणजे नुसते लिखाण करायचे नाही, तर ते लक्षात ठेवले की, अभ्यास झाला. आपली बुद्धी जड असते. तिला चांगले आणि वाईट काय ते कळत नाही. आपण म्हणतो, ‘मला गाडी पाहिजे; पण गाडीत सुख आहे का ?’ नाही. ती तर निर्जीव आहे. त्यात चैतन्य नाही; पण देवद आश्रमातील संत भक्तराज महाराज यांची गाडी निर्जीव असूनही तिच्यामध्ये चैतन्य आहे. मग शहाणे कोण ? आपण कि ती गाडी !

२. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी चंचल मन आणि बुद्धी स्थिर करण्यासाठी सांगितलेले उपाय

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्…..’ हा श्रीसुक्तातील मंत्र म्हटला आणि ते म्हणाले, ‘‘लक्ष्मीप्रमाणे आपले मनही चंचल आहे; म्हणून नामजप करायचा. बुद्धी स्थिर होण्यासाठी वर्षातून एकदा संकटनाशन स्तोत्राचे अनुष्ठान करायचे. आपली बुद्धी मेधाबुद्धी झाली पाहिजे, म्हणजे स्मरणशक्ती वाढते.’’ त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अथर्वला जवळ घेतले. ते पाहून माझी भावजागृती झाली आणि ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– सौ. रश्मी संजय धुपकर, बोरीवली, मुंबई. (१८.५.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now