(म्हणे) ‘देशातील परिस्थितीची भारतीय म्हणून लाज वाटायला हवी !’ – इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल

जिहादी आतंकवाद, गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आदी हिंदूंवरील आघातांविषयी नयनतारा सहगल यांना लाज वाटत नाही का ?

मुंबई – साहित्य संमेलनातील भाषणात मी सद्यस्थितीवर बोलणार होते. असहिष्णुता, हिंसाचाराच्या वातावरणावर भाष्य करणार होते. त्यामुळेच मला दिलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण आयोजकांकडून रहित करण्यात आले असावे, असे मत इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.

सहगल पुढे म्हणाल्या की,

१. गेल्या काही काळात अनेक विचारवंत आणि लेखक यांच्या हत्या झाल्या. गौरी लंकेश, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांनी जीव गमावला. प्रख्यात व्यक्तींच्या हत्या झाल्या, तर आपल्याला ठाऊक नसलेले अनेकजण जमावाकडून मारले गेले. (केरळ आणि कर्नाटक येथील शेकडो हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांविषयी बोलायला सहगल यांची दातखिळी का बसते ? – संपादक)

२. गोमांस सापडल्याच्या संशयावरून, गायींच्या तस्करीच्या अफवेवरून हिंसाचार चालू आहे. जमावाकडून खून पाडले जात आहेत. या हल्लेखोरांना सत्ताधार्‍यांचा आशीर्वाद आहे. (कायदा मोडून आणि जाणीवपूर्वक होणार्‍या गोहत्या सहगल यांना दिसत नाहीत का ? – संपादक)

३. गोवंश, गोमांस यांवरून होणार्‍या हत्या, द्वेषाचे राजकारण, लेखक-विचारवंत यांच्या हत्या यांविषयी प्रत्येक नागरिकाला लाज वाटायला हवी. (द्वेषाच्या आणि लांगूलचालनाच्या राजकारणापोटी काँग्रेसच्या काळात हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा उभा केला गेला. यात निरपराध हिंदूंचा प्रचंड छळ झाला, याची लाज सहगल यांच्यासारख्या तथाकथित पुरोगामी साहित्यिकांना (?) कधी वाटते का ? – संपादक)

४. ‘हा देश केवळ हिंदूंचा आहे’, असे काहींना वाटते; मात्र हा देश हिंदुस्थानातील प्रत्येकाचा आहे. (शब्दच्छल केला आणि कोणी कितीही दिशाभूल केली, तरी हा देश हिंदूंचाच आहे, हेच सत्य आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF