शिवछत्रपतींच्या पावनभूमीत हिंदु राष्ट्राचा जयघोष !

 • ‘फेसबूक लाइव्ह’च्या माध्यमातून ३४ सहस्रांहून अधिक दर्शक सहभागी !
 • १ सहस्र ६०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती

प्रौढप्रतापपुरंदर, गोब्राह्मणप्रतिपालक, क्षत्रियकुलावतंस श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी रायगडमध्ये कालगतीनुसार पुन्हा एकदा हिंदु राष्ट्रासाठी संघटित होण्याची हाक देणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा पौष शुक्ल पक्ष प्रतिपदेस, म्हणजेच ६ जानेवारी या दिवशी पनवेलनगरीत आयोजित करण्यात आली होती ! धर्मतेजाच्या चैतन्याची साक्षात् अनुभूती देणारी…, सद्गुरु आणि संत यांच्या उपस्थितीने कृतकृत्य झालेली… वक्त्यांच्या ओजपूर्ण वाणीतून प्रसारीत झालेल्या हिंदुतेजाने भारीत झालेली… मान्यवरांच्या उपस्थितांच्या पाठिंब्याने आश्‍वस्त करणारी…, सहस्रोंच्या संख्येने उपस्थित समस्त धर्माभिमानी हिंदु बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने उत्साह द्विगुणीत करणारी ही हिंदु राष्ट्र-जागृती सभा…! जिने पनवेल तालुक्यातील हिंदु धर्माभिमान्यांच्या मनात हिंदु राष्ट्र स्थापनेचे धर्मबीज रोवले, इतकेच नव्हे, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी सक्रीय होण्याचा निश्‍चय करून प्रेरितही केले ! 

 हिंदु राष्ट्र स्थापनेच्या नितांत आवश्यकतेविषयी वैचारिक प्रबोधन करणार्‍या पनवेल येथील मिडलक्लास मैदानावरील हिंदु राष्ट्र-जागृती सभेने दीड सहस्रांपेक्षा अधिक उपस्थित हिंदूंसह हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला…! हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी रायगड जिल्ह्यातील हिंदूंचे संघटन करून, तसेच त्यांना धर्मसंस्थापनेच्या या उदात्त कार्यात कृतीशील करण्यास वचनबद्ध करून त्यांच्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी या राष्ट्र-जागृती सभेने त्यांना उद्युक्त केले !

संतांची उपस्थिती, सभास्थळी चैतन्याधारीत सर्व कृती, वेदांचा उद्घोष, वैचारिक प्रबोधन आणि यांसमवेत वक्त्यांसह हिंदु धर्माभिमान्यांच्या धमन्यांमधील सळसळता उत्साह यांनी युक्त असलेल्या या सभेने ब्राह्म अन् क्षात्र तेजाचे सिंचन करीत पनवेल पंचक्रोशीला पावन केले… !

भगवे ध्वज नाचवत, क्रांतीज्योतीसह वक्त्यांचे सभास्थळी आगमन !

१. श्री. सुमित सागवेकर २. श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल ३. श्री. अभय वर्तक

…चैतन्याच्या आधारशीलेवर झालेली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

 • पारंपरिक पोषाखातील साधकांकडून समस्त हिंदु बंधू-भगिनींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत !
 • उपस्थित सर्वांच्या हृदयातील श्रीकृष्णाला नमस्कार करून सभेला प्रारंभ !
 • श्री गणेशाचा श्‍लोक उपस्थित हिंदूंकडून म्हणून आरंभ !
 • सनातनच्या सद्गुरूंच्या शुभहस्ते आत्मशक्ती जागृत कणारे अन् सभास्थळाची शुद्धी करणारे दीपप्रज्वलन !
 • दीपप्रज्वलन चालू असतांना चैतन्यमय धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना !
 • साक्षात् वेदकालाची प्रचीती देणारे वेदमंत्रपठण !
 • वेदमंत्रपठण चालू असतांना हिंदूंनी हात जोडून ग्रहण केले वातावरणातील चैतन्य !
 • सभा सर्वार्थाने साकार करणारी सनातनचे सद्गुरु आणि संत यांची वंदनीय उपस्थिती !

..यामुळे उपस्थितांमध्ये झाली वीरश्री जागृत !

 • हिंदु राष्ट्राचा जयघोष, ‘हर हर महादेव’चा गजर आणि ढोल-ताशांच्या लयबद्ध ठेक्यात, अत्यंत जोशपूर्ण वातावरणात वक्त्यांचे सभास्थळी स्वागत !
 •  शिरढोणवासियांनी आणलेली ज्योत व्यासपिठासमोर अखेरपर्यंत स्थानापन्न !
 • हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वैचारिक युद्धाला प्रारंभ झाल्याची ललकारी देणारा शंखनाद !
 • जोरदार घोषणांच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नमन !
 • हिंदूंचे भगवे सदरे आणि भगवे फेटे यांमुळे निर्माण झालेले भगवे वातावरण !
 • मंचासमोर दक्ष राहून रक्षण करणारे धर्मवीर !
 • वीरांच्या वेशातील घोषणा देणारे बालसाधक !
 • समस्त हिंदु धर्माभिमानी श्रोत्यांनी हात जोडून घेतलेली हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा !

हिंदूंचे धर्मपरिवर्तन करणारी चर्च बंद झाली पाहिजेत ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

आज पनवेल भागातील नाममात्र ख्रिस्ती लोकसंख्येसाठी येथे मोठ्या प्रमाणात चर्च उभारली आहेत. ख्रिस्त्यांकडून प्रलोभने देऊन हिंदु बांधवांचे धर्मांतर केले जात आहे. ‘द डग्स् अ‍ॅण्ड मॅजिक रेमिडीस् अ‍ॅक्ट’ या कायद्यानुसार प्रलोभने देेऊन धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. या प्रलोभनातून हिंदूंच्या धर्मपरिवर्तनाचाच उद्देश स्पष्ट होत आहे. हिंदूंचे धर्मपरिवर्तन करणारी ही चर्च बंद झाली पाहिजेत. पोलीस आणि प्रशासन यांनी यात लक्ष घातले पाहिजे. आज राममंदिरासाठी आपल्याला अनेक वर्षे झगडावे लागत आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर न्यायालये अधिकार गाजवत आहेत. शबरीमला आणि हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरील धर्मस्वातंत्र्यावर आघात होत आहेत. ही कोणती शासनव्यवस्था आहे ? आता हिंदु समाजाच्या आक्रोशाला सर्व राजकीय पक्षांना आणि हिंदु धर्माचा द्वेष करणार्‍यांना सामोरे जावे लागेल !

ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांचे आवाहन !

पनवेलकरांनो, सावध रहा !

तुमच्या मुलींना लव्ह-जिहादपासून वाचवण्यासाठी…!

तुमच्या मुलांना क्रिकेटच्या सट्ट्याचे व्यसन लागण्यापासून वाचण्यासाठी…!

तुम्ही आम्हाला वेळ द्या, आपण सर्वजण मिळून हिंदु राष्ट्र स्थापन करू !  अभय वर्तक, धर्मप्रसारक, सनातन संस्था

केवळ २ टक्के लोकसंख्या असलेल्या पनवेलमधील टोलेजंग चर्चमध्ये फर्नांडिस, रॉड्रीग्स् नव्हे, तर आमचे शेळके, पाटील, भोईर हे स्थानिक हिंदूच जात आहेत, ही आमची वेदना आहे. हे धर्मांतराचे एवढे मोठे षड्यंत्र चालू असतांना पनवेल पंचायत समितीने मात्र शाळांमध्ये सरस्वती पूजन आणि सत्यनारायण पूजन यांवर बंदी घातली आहे. पुरोगाम्यांच्या हत्याप्रकरणी तपासयंत्रणांचे अपयश लपवण्यासाठी अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेला ‘सॉफ्ट टार्गेट’ केले गेले आहे. हिंदु देवतांवर अश्‍लाघ्य टीका करणार्‍या पुरोगाम्यांना वैचारिक विरोध केल्याने सनातनच्या साधकांनी सनातन निर्मित ‘क्षात्रधर्म साधना’ हा ग्रंथ वाचून त्यांच्या हत्या केल्याची बोंब सुरक्षा यंत्रणांनी ठोकली. जेव्हा काश्मीरसहित देशभरात आतंकवाद्यांनी लाखो भारतियांच्या हत्या केल्या, तेव्हा त्या आतंकवाद्यांनी कोणते ग्रंथ वाचले होते, ते आजतगायत त्यांनी सांगितलेले नाही. सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हाच रामबाण उपाय आहे. पनवेल आणि ठिकठिकाणी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभांची उपस्थिती पहाता हिंदू असेच संघटित झाल्यास हिंदु राष्ट्र आता दूर नाही; म्हणून तुम्ही आम्हाला वेळ द्या, आपण सर्वजण मिळून हिंदु राष्ट्र स्थापन करू !

भारत हिंदु राष्ट्र घोषित झाले, तर हिंदूंच्या समस्या सुटतील ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

राज्यात ३ सहस्र ५०० हून अधिक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. राज्यकर्ते मंदिरांचा पैसा विकासकामांसाठी वापरून देवनिधी लुटत आहेत; परंतु चर्च आणि मशीद यांचा पैसा घेण्याचे सरकारचे धैर्य नाही. ही सरकारची धर्मनिरपेक्षता आहे का ? हज यात्रेसाठी जसे पैसे दिले, तशी आम्ही भीक मागणार नाही; पण मंदिरांतील निधीवर केवळ आमचाच हक्क आहे, याचे सरकारने भान ठेवावे. न्याययंत्रणा, पोलीस यंत्रणा, शिक्षणव्यवस्था, राज्यकर्ते या सर्वांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. वीज, पाणी, खड्डे सगळ्या समस्या आमच्यासमोर आहेत. धर्मांतर, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद या सर्वांमुळे हिंदू अल्पसंख्य होत आहेत. अयोध्या वाट पहात आहे, कधी राम मंदिर बांधणार ? आम्ही हिंदूंना एकच आवाहन करतो की, केवळ राममंदिरासाठी नको, तर हिंदु राष्ट्रासाठी अध्यादेश काढा ! एकदा का भारत हिंदु राष्ट्र घोषित झाले की, हिंदूंच्या सर्व समस्या एकाच दिवसात संपुष्टात येतील, मग राममंदिरच काय, तर मथुरा, काशीसह देशभरातील ४० हून अधिक मंदिरांचा विध्वंस करून बनलेल्या मशिदींचे पुन्हा मंदिरात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही.

सभेची वैशिष्ट्ये !

 • सनातनचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरित्रमय ग्रंथाचे महत्त्व वक्त्यांकडून विशद !
 • आपत्कालीन स्थितीत तारून नेणारी कोणत्या वनौषधींची लागवड कशी करावी, याची माहिती देणारा प्रदर्शनकक्ष !
 • सनातनच्या २ सद्गुरूंसह ४ संतांची उपस्थिती ही हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या धर्मकार्याचा लढा आध्यात्मिक स्तरावर ८० टक्के लढला जाणार आहे, याची साक्ष देणारी ठरली !
 • या सभेला पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

या वंदनीय संतांच्या उपस्थितीने सभास्थळ झाले पावन !

सनातनच्या १. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर,  २. पू. (सौ.) अश्‍विनी पवार, ३. सद्गुरु राजेंद्र शिंदे, ४. पू. गुरुनाथ दाभोलकर, ५. पू. रमेश गडकरी आणि उपस्थित हिंदू

आपत्कालाची संजीवनी : औषधी वनस्पती !

येणार्‍या आपत्कालात अ‍ॅलोपॅथीची औषधे उपलब्ध होणार नाहीत, या दूरदृष्टीने आयुर्वेदानुसार औषधी वनस्पतींच्या उपलब्धतेसाठी त्यांची लागवड करणे आवश्यक आहे ! समाजाला याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सभास्थळी उभारलेला औषधी वनस्पतींचा कक्ष !

छत्रपती शिवरायांना अभिवादन !

ज्यांच्यामुळे आमच्या कपाळावर आज कुंकू दिसत आहे, ज्यांच्यामुळे आमचा भगवा ध्वज महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानात डौलाने फडकत आहे. ज्यांच्यामुळे तुम्ही-आम्ही एक ‘हिंदु’ म्हणून आयुष्य जगत आहोत, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना सभेपूर्वी मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण !

वेदमंत्रपठण करतांना ब्रह्मवृंद !

सभेच्या प्रारंभी दामोदर ओगलेगुरुजी आणि तन्मय पंडितगुरुजी यांनी वेदमंत्रपठणाची सेवा करून देवतांचे स्तवन केले ! राष्ट्र-जागृती सभेचे संरक्षण होण्यासह धर्माधिष्ठीत राज्याचा संकल्प वेदमंत्रांच्या माध्यमातून करण्यात आला ! शिरढोण येथील विनायक वाकडीकर यांनी पुरोहितांचा सत्कार केला.

सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत कृतीशील झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी ‘साधना आणि राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एक शिबीर, राष्ट्र-धर्म रक्षणार्थ सरकारला जाब विचारण्यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि हिंदूंना जागृत करण्यासाठी अन्य गावांत हिंदु राष्ट्र जागृती सभा घेण्याचे निश्‍चित केले. तसेच पनवेल, कामोठे, कळंबोली आणि पनवेल येथील आढावा बैठकांना येण्याचेही ठरवले !

…यांचे सभेला विशेष सहकार्य लाभल्याने देवाचरणी कृतज्ञता !

१. निवासाची व्यवस्था करणारे श्री. राजूशेठ गुप्ते

२. ध्वनीक्षेपक यंत्रणा देणारे श्री. जगदीश गायकवाड

३. जनरेटर व्यवस्था पुरवणारे श्री. कोळी

४. माऊली ढोल-ताशा पथकाचे अध्यक्ष महेश पाटील

५. अप्पा कंटेनर सर्व्हिस बाल रोड लाईन, कळंबोली

६. मिडलक्लास सोसायटी

सभास्थळी उपस्थित पुढील मान्यवरांनी हिंदु राष्ट्र संकल्पनेस पाठिंबा दर्शवला !

राजयोगी सद्गुरु श्री श्री श्री १०८ प.ब्र. श्री शिवकुमार शिवाचार्य महास्वामी सध्यर्थपीठ, सिद्धवट, भैरवगड, उज्जैन, मध्यप्रदेश

महंत राऊळ महाराज, संस्थापक, आेंकार भक्ती प्रसारक समिती, आंब्रड, सिंधुदुर्ग

ह.भ.प. गणेश महाराज, पनवेल

ह.भ.प. मारुती महाराज कोलाटकर, कीर्तनकार

ह.भ.प. चंदन महाराज पाटील, कीर्तनकार

श्री. प्रभाकर विठ्ठल पंडित (गुरुजी), पुरोहित/ज्योतिषी

श्री. मोतीलाल जैन, अध्यक्ष, श्‍वेतांबर मूर्तिपूजक संघ, पनवेल

श्री. प्रद्युम्न शर्मा, गायत्री परिवार, पनवेल

श्रीमती संतोष मिश्रा, प्रबंधक, सहयोग स्नेह सेवा संस्थान

श्री. दीपक बांदेकर, अध्यक्ष, शंकर वारूळ मंदिर ट्रस्ट, विक्रोळी

श्री. प्रमोद कर्णेकर, उपसरपंच, शिरढोण

सौ. सरस्वती कथारा, महिला पोलीस कमिटी, सदस्य, कळंबोली

श्री. नारायण दामोदर ठाकूर, अध्यक्ष, पनवेल व्यापारी संघ

श्री. सी.सी. भगत, भाजप राज्य परिषद

श्री. बबनदादा पाटील, रायगड जिल्हा सल्लागार, शिवसेना

अधिवक्ता प्रथमेश सोमण, पनवेल महानगर संघटक, शिवसेना

श्री. रामदास शेवाळे, पनवेल महानगर प्रमुख, शिवसेना

श्री. माधव भिडे, माजी रायगड जिल्हाप्रमुख, शिवसेना

श्री. अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

श्री. संबाजी धावीर, हिंदू एकता संघटना, कळंबोली

अधिवक्ता खुश खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, युवा मोर्चा, हिंदुस्थान नॅशनल पार्टी

सभेला विशेष प्रसिद्धी देणारी माध्यमे ! :

दैनिक कर्नाळा, किल्ले-रायगड, रामप्रहर, साप्ताहिक कोकणसंध्या, कर्नाळा टी.व्ही.


Multi Language |Offline reading | PDF