एका सात्त्विक पोपटाविषयीची ध्वनीचित्र-चकती पहातांना आध्यात्मिक त्रास होणे, मनात नकारात्मक विचार येणे आणि त्या पोपटाला प्रत्यक्षात शिबीरस्थळी आणल्यावर आध्यात्मिक उपाय होऊन ढेकरा अन् जांभया येऊ लागणे

‘आज एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिराचा सहावा दिवस होता. शिबिराच्या एका सत्रात एका सात्त्विक पोपटाविषयीची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली आणि ‘पोपटाला पाहून काय जाणवते ?’, याचा एक प्रयोग करून घेण्यात आला. ध्वनीचित्र-चकती पहातांना मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला. मला त्रास देणारी मोठी वाईट शक्ती माझ्या मनात नकारात्मक विचार घालत होती, तसेच ती इतरांची खिल्ली उडवत होती. जेव्हा त्या पोपटाला प्रत्यक्षात शिबीरस्थळी आणले, तेव्हा मला त्याच्याकडून येणारे चैतन्य मिळून ढेकरा आणि जांभया येऊ लागल्या.’

– एक साधक, युरोप (१२.८.२०१५)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now