बांधकाम व्यावसायिक, दलाल यांच्या गाड्यांसाठी मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था शिथील ?

मुंबई – मंत्रालयात सर्वसामान्यांना अतिशय काटेकोरपणे तपासणी करून प्रवेश दिला जातो; मात्र मंत्र्यांच्या दालनातून अधिकार्‍याचा दूरभाष आला की, बांधकाम व्यावसायिक, दलाल यांच्या गाड्यांना थेट मंत्रालयात प्रवेश मिळतो. (मंत्रालयाच्या सुरक्षेचे नियम सर्वसामान्य आणि महत्त्वाच्या व्यक्ती यांना वेगवेगळे आहेत का, हे शासनकर्त्यांनी सांगितले पाहिजे. – संपादक)

सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश घेतांना प्रवेश पास काढावा लागतो. त्यासाठी आधारकार्ड-पॅनकार्डचा पुरावा सादर करावा लागतो. महत्त्वाच्या मंत्र्यांच्या दालनाला ‘कोडवर्ड’ दिले आहेत. या दालनातून केवळ वॉकीटॉकीच्या एका संदेशावर बांधकाम व्यावसायिकांच्या गाड्या आणि त्यांच्या खासगी अंगरक्षकांच्या गाड्याही शिरतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत, असे समजते.


Multi Language |Offline reading | PDF