मेलेल्या पिल्लाच्या माध्यमातून वाईट शक्तींनी केलेले आक्रमण

सौ. राधा मल्लिक

१. घराच्या मागे असलेल्या बागेत गेल्यावर झाडावरील सर्व फुले कोमेजून गेल्याचे दिसणे, तेथे मांजराचे एक नवजात पिल्लू मेलेले दिसणे, हे दृश्य पाहून मला मानसिक क्लेश होऊन आध्यात्मिक त्रास वाढणे आणि नामजपादी उपाय केल्यानंतरही ते दृश्य मनातून न जाणे

‘मी आणि माझे यजमान अमेरिकेमध्ये सासू-सासर्‍यांच्या घरी रहायला आलो होतो. त्या वेळी मी प्रतिदिन सकाळी आमच्या घराच्या मागे असलेल्या बागेतून श्रीकृष्णाला वाहाण्यासाठी जास्वंदीची फुले आणत होते. परसामध्ये माझी सासू मांजरांसाठी खाद्य ठेवत असल्याने तेथे बरीच भटकी मांजरे जमा होत असत. २५.७.२०१६ या दिवशी सकाळी मी बागेत गेल्यावर झाडावरील सर्व फुले उमलण्याऐवजी कोमेजून गेल्याचे मला दिसलेे. त्यांच्याकडे पाहून मला वाटले, ‘ती जणू मरून गेली आहेत.’ मी जेव्हा खाली पाहिले, तेव्हा तेथे मांजराचे एक नवजात पिल्लू मेलेले दिसले. त्याच्यावर माशा घोंगावत होत्या. हे दृश्य पाहून मला मानसिक क्लेश झाले आणि माझा आध्यात्मिक त्रासही पुष्कळ वाढला. मी हा क्लेशदायी अन् निराशाजनक विचार एका कागदावर लिहिला, त्याच्या भोवती नामजपाचे मंडल घातले आणि एकाग्रतेने नामजप करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या मरणार्‍या पिल्लाचे दृश्य माझ्या मनातून जात नव्हते. जवळजवळ १ – २ घंटे मला हा मानसिक त्रास होत होता.

२. श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर साधिकेच्या मनातील त्रासदायक विचार आणि आध्यात्मिक त्रास उणावणे अन् साधिका तसेच तिचे यजमान यांना दिवसभर वातावरणात पुष्कळ दाब अन् त्रास जाणवणे

त्यानंतर ‘मला त्रास देणार्‍या मोठ्या वाईट शक्तीने माझ्या देहात बनवलेली त्रासदायक शक्तीची यंत्रे आणि स्थाने नष्ट होऊ देत, मरणार्‍या पिल्लाविषयीचे विचार नष्ट होऊ देत’, अशी प्रार्थना मी श्रीकृष्णाला करत होते. त्यानंतर माझ्या मनातील ते विचार आणि माझा आध्यात्मिक त्रास उणावला. दिवसभर मला आणि माझ्या यजमानांना वातावरणात पुष्कळ दाब अन् त्रास जाणवत होता.

३. ‘साधिकेला भीती वाटून तिचा आध्यात्मिक त्रास वाढावा’, यासाठी वाईट शक्तींनी हा प्रसंग घडवला होता’, असे उत्तरदायी साधकांनी सांगणे आणि तिला पिल्लावर कापूर अन् विभूती टाकण्यास, तसेच संरक्षक कवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगण्यात येणे

या प्रसंगाविषयी उत्तरदायी साधकांना विचारल्यावर मला समजले, ‘मला भीती वाटून माझा आध्यात्मिक त्रास वाढावा’, यासाठी वाईट शक्तींनी हा प्रसंग घडवला होता.’ त्यांनी त्या पिल्लावर कापूर आणि विभूती टाकण्यास अन् ‘त्याच्यातील त्रासदायक शक्ती नष्ट होऊ दे. ती वातावरणात न पसरता तिचे विघटन होऊ दे. मी आणि माझे यजमान यांच्याभोवती संरक्षक कवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना करण्यास आम्हाला सांगितले.

४. दुसर्‍या दिवशी ते पिल्लू न सापडणे आणि ‘ते कुठे गेले ?’, याविषयी काहीही न समजणे

दुसर्‍या दिवशी जेव्हा माझे यजमान आणि सासरे त्या पिल्लाची विल्हेवाट लावण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तेथे ते सापडले नाही. रात्रभर मोठा पाऊस पडला होता, तरीही आदल्या दिवशी मी जेव्हा त्या पिल्लाला पाहिले होते, तेव्हा ते सडलेले आणि कुजलेले होते; मात्र ‘त्याच्या संदर्भात नेमके काय झाले ? ते कुठे गेले ?’, हे आम्हाला कळले नाही.’

– सौ. राधा मल्लिक, व्हॅन्कुुवर, कॅनडा. (२५.७.२०१६)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF