पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सनातनच्या देवद आश्रमातील साधकांनी अनुभवले चैतन्यमयी अन् भावपूर्ण क्षण !

‘साधकांना आनंद आणि चैतन्य यांनी ओतप्रोत भरलेल्या भावक्षणांची भेट देण्यासाठी गुरुमाऊली आतुर असते. कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी, म्हणजे ३ डिसेंबर २०१८ या दिवशी देवद आश्रमातील साधकांनी गुरुमाऊलींची ही प्रीती अनुभवली ! निमित्त होते देवद आश्रमाचा आधारस्तंभ असलेल्या पू. अश्‍विनीताईंच्या वाढदिवसाचे ! कधी प्रेरणामूर्ती, तर प्रसंगी कठोर होऊन साधकांना घडवणार्‍या अद्वितीय अशा पू. अश्‍विनीताईंच्या चरणी भावसुमने अर्पण करण्यासाठी या दिवशी आश्रमातील प्रत्येक जणच आतुर झाला होता. एका अनौपचारिक चैतन्यसोहळ्याद्वारे साधकांना पू. ताईंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी लाभली. त्याचा हा वृत्तांत !

सर्व साधकांच्या शुभेच्छा आनंदाने स्वीकारतांना पू. (सौ.) अश्‍विनी पवार
पू. (सौ.) अश्‍विनीताईंच्या वाढदिवसानिमित्त साधकांनी त्यांच्यासाठी बनवलेल्या शुभेच्छापत्रांची वैशिष्ट्यपूर्ण रचना !

१. साधकांनी केलेली वैशिष्ट्यपूर्ण अन् उत्साहपूर्ण सिद्धता !

साधकांनी पाना-फुलांची सात्त्विक रचना अन् शुभेच्छापत्रे यांनी पटल सजवले होते. चॉकलेटची वैशिष्ट्यपूर्ण रचना केली होती. सर्वजण पू. अश्‍विनी ताई खोलीत येण्याची आतुरतेने वाट पहात होते. पू. ताईंच्या आगमनाचा क्षण टिपण्यासाठी साधक भ्रमणभाष आणि छायाचित्रक घेऊन सिद्ध होते. पू. ताईंचे खोलीत आगमन होताच भ्रमणभाषवर लावलेल्या सनईच्या मंगलमय सुरांनी वातावरण हर्षोल्लासित झाले.

कु. प्राजक्ता धोतमल

२. अंतर्मुख आणि भाव जागृत करणारा अविस्मरणीय सोहळा !

पू. ताईंनी शुभेच्छापत्रे पाहिल्यावर आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. अनघा जोशी यांनी दोन गीतांचे भावपूर्ण गायन केले. त्यातील ‘प्रियवर गुरुमाऊली …’ या गीतातून सर्व साधकांच्या वतीने ‘साधनेत पावलोपावली मार्गदर्शन करणार्‍या पू. ताई म्हणजे साधकांसाठी गुरुरूपच असून आम्हाला भवसागरातून तारून न्या’, अशी प्रार्थना केली, तर ‘पू. ताई हम करे कृतज्ञता अर्पण &’ या गीतातून देवद आश्रमातील साधकांच्या उन्नतीचा ध्यास घेणार्‍या पू. अश्‍विनीताईंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर देवी सरस्वतीवर आधारित गीताच्या आवाजावर पू. ताईंच्या छायाचित्रांचे चलचित्ररूपी शुभेच्छापत्र त्यांना देण्यात आले. या गीतामध्ये देवी सरस्वतीला सद्बुद्धी देण्यासाठी याचना केली आहे. खरोखरच पू. अश्‍विनीताई म्हणजे दोष-अहंच्या आवरणात अडकलेल्या आम्हा अज्ञानी जिवांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणार्‍या मार्गदर्शक आहेत ! त्या आम्हाला साधना करण्याची सद्बुद्धी देत आहेत.

३. सोहळ्याला लाभली संत अन् सद्गुरु यांची वंदनीय उपस्थिती !

या सोहळ्याला सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि आश्रमातील अन्य संतही उपस्थित असल्याने सर्वांना चैतन्याचा लाभ झाला. यामुळेच सर्वांनी आनंद आणि उत्साह यांसह अंतर्मुखताही अनुभवली.

४. पू. अश्‍विनीताईंची विनम्रता !

पू. ताईंनी सर्व साधकांना ३-४ वेळा हात जोडून नमस्कार केला. प्रत्येक साधक भेटत असतांना तितक्याच मनापासून त्यांनी सर्वांना प्रतिसाद दिला. यातून पू. अश्‍विनीताईंमधील विनम्रता, व्यापकता आणि प्रीती अनुभवता आली.

परात्पर गुरुमाऊली आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे देवद आश्रबबबब मातील साधकांना हे आनंददायी क्षण अनुभवायला मिळाले. साधनेचे प्रयत्न वाढवण्यासाठी अंतर्मुखता, भरभरून चैतन्य, संतांचे कृपाशीर्वाद आणि उत्साह यांची शिदोरी लाभली. यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती अल्पच आहे !’

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

‘कु. प्राजक्ता धोतमल हिने पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे इतके सुंदर वर्णन केले आहे की, ते वाचतांना वाटते, ‘आता कार्यक्रम सुरू आहे आणि आपण तेथे आहोत.’ याबद्दल प्राजक्ताचे कौतुक करावे तेवढे थोडे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF