वनक्षेत्रात मंदिर बांधण्याला विरोध करणार्‍या वनाधिकार्‍याला काँग्रेसच्या आमदाराकडून हात आणि पाय तोडण्याची धमकी !

  • एकीकडे काँग्रेस अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर बांधण्यास विरोध करते, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विनाअनुमती वनक्षेत्रात मंदिर बांधण्याला विरोध करणार्‍या वनाधिकार्‍यांना धमकी देतात !
  • काँग्रेसचे आमदार राममंदिराला विरोध करणार्‍या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना अशी धमकी देऊ शकतात का ?

बेंगळूरू – कर्नाटकमधील भद्रावती भागातील वनक्षेत्रात मंदिर बांधण्याला आक्षेप घेणार्‍या एका वनाधिकार्‍याला काँग्रेसचे आमदार बी.के. संगमेश्‍वरा यांनी हात आणि पाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या धमकीची ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली आहे.

३१ डिसेंबरला या गावकर्‍यांकडून मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्या वेळी या वनाधिकार्‍याने या गावकर्‍यांना ‘तेथे मंदिर बांधण्यासाठी वन विभागाची अनुमती घ्यावी लागेल. त्यानंतरच काम चालू करू शकता’, असे सांगत काम बंद करण्यास सांगितले. (अशा प्रकारे मशीद किंवा चर्च कुणी बांधण्याचा प्रयत्न केला असता तर वनाधिकार्‍याने त्याला विरोध केला असता का ? – संपादक) गावकर्‍यांनी ही गोष्ट आमदार संगमेश्‍वरा यांना सांगितल्यावर त्यांनी वनाधिकार्‍यांना दूरभाष करून धमकी दिली.


Multi Language |Offline reading | PDF