(म्हणे) ‘भगवा आतंकवाद हा खरा आहे !’ – स्वरा भास्कर

केरळमध्ये शबरीमला मंदिर प्रकरणावरून चालू असलेल्या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेत्रीची (?) हिंदुद्रोही प्रतिक्रिया !

केरळ राज्यात संघ आणि भाजप यांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्या वेळी हत्या करणार्‍यांचा रंग सांगण्याची घाई स्वरा भास्करला झाली नाही. हिंदुद्वेष यांच्या नसानसांत किती भिनला आहे, हे यातून लक्षात येते.

मुंबई – पोलीस ठाणे अथवा कुठेही बॉम्ब फेकणार्‍यांना आतंकवादीच म्हटले जाईल. त्यांनाही फाशीची शिक्षा होणार का ? ‘भगवा आतंकवाद’ हा खरा आहे, अशा शब्दांत हिंदी चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यावर ट्विटर या सामाजिक प्रसारमाध्यमावरून टीका केली आहे. पोलीस ठाण्यावर गावठी बॉम्ब फेकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. त्याचा दाखला देत स्वरा भास्करने मुक्ताफळे उधळली आहेत. शबरीमला प्रकरणावरून केरळ राज्यामध्ये तणावाची परिस्थिती असून महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने, आंदोलने करण्यात आली. त्यांना हिंसक वळण मिळाले असून केरळमधल्या नेडुमांगडू पोलीस ठाण्यावर ४ गावठी बॉम्ब फेकण्यात आले.

(संदर्भ : ‘लोकसत्ता’ संकेतस्थळ)


Multi Language |Offline reading | PDF