केरळमधील हिंसाचारानंतर ब्रिटनकडून भारतातील त्याच्या नागरिकांना सतर्कतेची सूचना

कुठे परदेशात वास्तव्य करणार्‍या स्वतःच्या नागरिकांच्या सुरक्षेविषयी सतर्क असणारा ब्रिटन, तर कुठे जगभरातील सोडाच भारतातील हिंदूंवर अत्याचार होत असतांना त्यांच्या रक्षणासाठी काहीही न करणारे भारतातील सर्वपक्षीय शासनकर्ते !

लंडन – केरळमध्ये शबरीमला मंदिरात माकपची कार्यकर्ती आणि अन्य एक महिला यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावरून राज्यात तणावाची स्थिती आहे. अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला आहे. या स्थितीत ब्रिटन सरकारने भारतात प्रवास करणार्‍या त्याच्या नागरिकांसाठी सूचना दिल्या आहेत. भारतात प्रवास करतांना नागरिकांनी सतर्क रहावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, तसेच केरळमध्ये जाणार्‍या नागरिकांनी प्रसारमाध्यमांकडून प्रसारित होणार्‍या वृत्तांकडे लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now