आतापर्यंत श्रीलंका आणि मलेशिया येथील महिलांसह १० महिलांनी भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले !

थिरूवनंतपूरम् – केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आतापर्यंत १० ते ५० वयोगटाच्या आत असणार्‍या १० महिलांनी मंदिरात प्रवेश करून भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले आहे. यात श्रीलंकेची १ आणि मलेशियाच्या ३ महिलांचा समावेश आहे. १ जानेवारीला मलेशियाच्या या महिलांनी मंदिरात जाऊन प्रवेश घेतल्याचे एका ध्वनीचित्रफितीतून समोर आले आहे. (हिंदूंच्या धार्मिक परंपरा लोकशाही व्यवस्थेद्वारे रहित केल्या जात असतील, तर हिंदूंनी अशी व्यवस्था पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कटीबद्ध व्हावे ! – संपादक) या महिलांनी दर्शन करतांना शालीने चेहरा झाकल्याचे या ध्वनीचित्रफितीत दिसत आहे. या तीनही महिला तमिळ वंशाच्या आहेत. मलेशियातील ज्या ३ महिलांनी दर्शन घेतले आहे, त्यांचे नाव, वय आणि इतर माहिती पोलिसांनी स्वतःकडे ठेवली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now