पाकमधील पेशावर येथील ‘पंज तीरथ’ धार्मिक स्थळ ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून घोषित

पाकमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद होत असतांना त्यापासून जगाचे लक्ष विचलित करण्याचा पाकचा हा प्रयत्न ! ‘पाकमधील हिंदूंसाठी आम्ही काही तरी करतो’, हे जगाला दाखवून स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी पाक कसा प्रयत्न करतो, हेच यातून दिसून येते !

पेशावर – पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांताच्या सरकारने पेशावरमधील प्राचीन हिंदु धार्मिक स्थळ ‘पंज तीरथ’ला ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून घोषित केले आहे. येथे असणार्‍या ५ सरोवरांमुळे याला ‘पंज तीरथ’ असे नाव पडले आहे. येथे मंदिरही आहे. तसेच सरकारने या प्राचीन स्थळाची हानी केल्याच्या प्रकरणी दोषी ठरलेल्यांना २० लाख रुपये दंड आणि ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

हे स्थान महाभारतातील पांडवांचे पिता महाराजा पंडू यांच्या काळातील आहे. कार्तिक मासामध्ये हिंदू येथे पवित्र स्नान करण्यासाठी येतात. वर्ष १७४७ मध्ये अफगाणिस्तानच्या दुर्रानी राजवंशाच्या काळात याची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर वर्ष १८३४ मध्ये शिखांच्या शासनकाळात त्याचा जीर्णोद्धर करण्यात आला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now