पाकला मिळणारे १.३ अब्ज डॉलरचे साहाय्य बंद करणार ! – ट्रम्प यांची घोषणा

आर्थिक साहाय्य बंद करण्यासह पाकमधील जिहादी आतंकवाद्यांचे प्रशिक्षण तळ नष्ट करण्यास का सांगत नाही ?

वॉशिंग्टन – पाकिस्तानसह आम्हाला पुष्कळ चांगले संबंध हवे आहेत; पण तो शत्रूंना (जिहादी आतंकवाद्यांना) थारा आणि आश्रय देत आहे. त्यामुळे चांगले संबंध प्रस्थापित होत नाहीत. पाकमधील नव्या नेतृत्वाशी लवकरात लवकर चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे; मात्र १.३ अब्ज डॉलरचे (अनुमाने ४४ सहस् १५ कोटी रुपयांचे) देण्यात येणारे साहाय्य आम्ही आता थांबवत आहोत; कारण आमच्यासाठी पाक काहीही करत नाही, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF