(म्हणे) ‘बंगाली व्यक्ती म्हणून केवळ ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान बनण्याची संधी असेल !’ – बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष

बंगाली व्यक्ती मुसलमानप्रेमी असेल, ती हिंदूंचे सण, उत्सव यांच्यावर प्रतिबंध घालत असेल, धर्मांधांना राज्यात उघडपणे हिंदूंवर आक्रमण करू देत असेल, जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालत असेल, बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करत नसेल, तर ती तथाकथित हिंदुत्वनिष्ठ भाजपच्या अध्यक्षांना चालेल का ? हेही त्यांनी सांगायला हवे !

कोलकाता – मी ‘ममता बॅनर्जी यांना उत्तम आरोग्य आणि जीवनात यश मिळो’, अशी प्रार्थना करतो. त्यांच्या यशस्वीतेवरच आमच्या राज्याचे भविष्य अवलंबून आहे. तसेच जर कुठल्या बंगाली व्यक्तीला पंतप्रधान बनण्याची संधी असेल, तर त्या ममता बॅनर्जी आहेत. त्यांना चांगले काम करता यावे, यासाठी त्या तंदुरुस्त रहाव्यात, अशी आमची इच्छा आहे, अशा शुभेच्छा बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ५ जानेवारी या दिवशी त्यांच्या वाढदिवसाला दिल्या.

घोष पुढे म्हणाले, ‘‘ज्योती बसू यांच्याकडेही पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती; मात्र त्यांच्या पक्षानेच त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही.’’

घोष यांच्या या विधानावरून काँग्रेसने भाजपवर टीका करतांना म्हटले की, आता भाजपचे नेतेही ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार नाहीत’, हे मान्य करू लागले आहेत.

दिलीप घोष यांचे घुमजाव !

दिलीप घोष यांच्या वरील विधानावरून राजकीय क्षेत्रात चर्चा होऊ लागल्यावर त्यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्‍नावर दिलेल्या उत्तरात ‘आपण केवळ गमतीने असे बोललो’, असे स्पष्टीकरण दिले आहे. ‘प्रत्यक्षात ममता बॅनर्जी पंतप्रधान होणे अशक्य आहे आणि मोदीच परत पंतप्रधान होतील’, असे घोष यांनी म्हटले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now