आंध्रप्रदेश सरकारकडून ३० बेरोजगार ब्राह्मण तरुणांना चारचाकी गाड्या

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ३० बेरोजगार ब्राह्मण युवकांना ‘स्विफ्ट डिझायर’ या चारचाकी वाहनांचे वाटप केले. या गाड्यांच्या किमतीपैकी प्रत्येकी २ लाख रुपये ब्राह्मण वेल्फेअर कॉर्पोरेशनकडून देण्यात येणार आहेत. तर १० टक्के त्या तरुणांना भरावे लागणार आहेत. उर्वरित रक्कम आंध्रप्रदेश सरकार ब्राह्मण क्रेडिट सोसायटीकडून कर्जाच्या माध्यमातून भरणार आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी याआधी राज्यातील जनतेला ‘स्मार्टफोन’ देणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी १ कोटी ४ लाख ‘स्मार्टफोन’ खरेदी करण्यात येणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF