उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी भेट घेतली !

हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान

(१) योगी आदित्यनाथ यांची भेट घेतांना (२) श्री. चेतन राजहंस

प्रयागराज (कुंभनगरी) – ५ जानेवारी या दिवशी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी आले होते. त्या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी सनातनच्या वतीने प्रकाशित ‘देवनदी गंगाजी की रक्षा करे’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ, तसेच ‘सनातन पंचांग २०१९’ त्यांना भेट देण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांसह अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज आणि जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्य महाराज उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर अन् पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ अन् उत्तर भारत आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF