प.पू. दास महाराज यांचे आणि सूक्ष्म परीक्षण करणारे श्री. राम होनप यांचे परीक्षण एकच असणे

प.पू. दास महाराज

‘प.पू. दास महाराज प्रतिदिन साधकांसाठी नामजपादी उपाय करतात. त्यांनी मला सांगितले, ‘‘ते जेव्हा साधकांसाठी नामजपादी उपाय करतात, तेव्हा त्यांना त्यांच्या शरिरात एक दिव्य शक्ती येतांना जाणवते. त्यानंतर एक ज्योत दिसते आणि त्यातून साधकांच्या दिशेने त्यांच्या भावानुसार चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवते.’’ ‘मला जाणवते ते योग्य आहे का ? किंवा उपायांच्या वेळी नेमकी सूक्ष्म प्रक्रिया काय घडते ?’, यांविषयीचे महाराजांनी मला सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगितले. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही सर्व योग्य सूक्ष्म प्रक्रिया सुरेख पद्धतीने सांगितली आहे.’’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF