इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण आयोजकांकडून रहित !

मुंबई – देशात असहिष्णुता असल्याची ओरड करत पुरस्कार परत करणार्‍या इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रहित केले आहे. याविषयीचे संगणकीय पत्र सहगल यांना आयोजकांकडून पाठवण्यात आले आहे. या पत्रात सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रहित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मनसेने काही दिवसांपूर्वीच ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल आल्यास साहित्य संमेलन उधळून लावू’, अशी चेतावणी दिली होती, तसेच राजकीय दबावामुळे हे निमंत्रण रहित करण्यात आल्याचे बोलले जाते. याविषयी सहगल यांनी नाराजी व्यक्त करत ‘मी असहिष्णुतेविषयी बोलणार असल्यामुळे माझे निमंत्रण रहित केले आहे’, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF