एका शहरातील एका शाळेतून चालणारे धर्मांतर !

एका शहरातील एका भागामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक हिंदू असून एक ख्रिस्ती शाळा या हिंदूंना त्यांच्या धर्माकडे वळवत आहे. या शाळेतील एका साधक शिक्षिकेने दिलेल्या पुढील उदाहरणांतून हे लक्षात येईल !

१. हिंदु मुलींना कुंकू, बांगड्या, पैजण, ताईत, लॉकेट घालण्यास अनुमती नसणे !

या शाळेत हिंदु मुलींनी कुंकू, बांगड्या, पैजण, ताईत किंवा लॉकेट घालणे याला सक्त बंदी आहे. तसे कोणी घालून आले तर १०० किंवा त्यापेक्षा अधिक दंड आकारला जातो. (लहानपणापासून हिंदु धर्माचे संस्कार होऊ नयेत, म्हणून बलपूर्वक त्यांना हिंदु धर्माचरणापासून तोडणारे हिंदुद्वेषी ख्रिस्ती म्हणे शांतीचा संदेश देतात ! घटनेने प्रत्येकाला धर्माचरणाचा अधिकार दिला आहे, हे लक्षात घेऊन हिंदु पालकांनी याविरोधात तीव्र आंदोलन उभारणे आवश्यक आहे ! – संपादक)

२. स्वतःला आवडत नाही म्हणून हिंदु विद्यार्थिनीला कुंकू लावण्यास विरोध करणारे ख्रिस्ती शिक्षक !

एकदा सकाळी प्रार्थनेला आलेल्या मुलांपैकी एका मुलीने छोटासा कुंकवाचा टिळा लावला होता. त्यावर एक बंगाली शिक्षिका म्हणाली, ‘‘तू कुंकू का लावलेस ?’’ त्यावर मी त्या शिक्षिकेला विरोध करून त्या मुलीला आत पाठवले. हा प्रकार एका मुसलमान शिक्षिकेने बघितला. ती मला म्हणाली ‘‘मॅडम तुम्ही नवीन आहात. इथले ख्रिस्ती सर आणि मॅडम यांना हे आवडत नाही ! ’’

३. हिंदु शिक्षिकांना हिंदु धर्माचरण सोडण्यासाठी आमिषे दाखवणे आणि शिक्षिकाही स्वधर्माभिमान नसल्याने त्याला बळी पडणे !

येथील हिंदु शिक्षिका ‘हिंदु’ असूनही आपण ख्रिस्ती शाळेत शिकवतो म्हणून बांगड्या, कधीकधी कुंकूही लावणे टाळतात. त्यांना या कामगिरीविषयी दुसर्‍या कामात सवलत दिली जाते. त्यांचे वेतनही कापले जात नाही; मात्र मी हिंदु धर्माप्रमाणे आचरण करत असल्याने माझे वेतन कापले जाते. (हिंदूंनी हिंदु धर्माप्रमाणे आचरण न करता ख्रिस्ती धर्माप्रमाणे आचरण करावे म्हणून त्यांचे वेतन कापणे, त्यांना कामात सूट देण्याची प्रलोभने देणे, हा शिक्षकांना बलपूर्वक ख्रिस्ती करण्याचाच प्रकार आहे, हे लक्षात घ्या ! ही आहे तथाकथित प्रेमाचा संदेश पसरवणार्‍या ख्रिस्त्यांची असहिष्णु मानसिकता ! – संपादक)

४. हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक ख्रिस्ती प्रार्थना आणि ख्रिस्त्यांप्रमाणे नमस्कार करायला लावणारे ख्रिस्ती !

या शाळेत ३ वेळा येशूच्या प्रार्थना होतात आणि प्रत्येक वेळी ‘आमीन’ असे म्हणून ‘क्रॉस’च्या चिन्हाप्रमाणे हात करतात. त्यांच्या प्रार्थनेत येशूला ‘स्वर्गाची देवता’ असे म्हणतात. ‘आम्हाला रोजची भाकर मिळू दे, तूच आमचा पालनकर्ता आहेस’ अशी त्यांची प्रार्थना असते. हिंदु मुलांनाही ही प्रार्थना बलपूर्वक म्हणावी लागते ! (यामुळे हिंदु मुलांवर येशूच्याच प्रार्थनेचा संस्कार झाला, तर काय नवल ? एकीकडे या परिसरातील सरकारी शाळांत हिंदूंच्या देवतांची पूजा करायची नाही, असा आदेश काढण्यात आला आहे आणि दुसरीकडे येथील शाळांमध्ये ख्रिस्ती प्रार्थना म्हणण्याची बळजोरी होत आहे ! हिंदूंनो, यातून आपली पुढची पिढी ख्रिस्तीच बनत आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

५. हिंदु पालकांकडून वस्तू आणि वर्गणी गोळा करून नैसर्गिक आपत्ती आलेल्या ठिकाणी स्वतःच्या नावाने पाठवून धर्मप्रसार आणि धर्मांतर करणे !

कुठेही नैसर्गिक आपत्ती आली, तर ती शाळा प्रत्येक मुलाला पालकांकडून सर्व वस्तू आणायला लावते आणि त्या ठिकाणी ते साहित्य पाठवतांना स्वतःच्या नावावर पाठवते. त्यामुळे ख्रिस्ती किती साहाय्य करतात असे दिसून येते, तसेच त्या ठिकाणी या साहाय्याचे आमिष दाखवून परत धर्मांतर केले जाते. प्रत्यक्षात हे साहाय्य हिंदूंनीच केलेले असते ! मागील वर्षी केरळला पूर आला होता, तेव्हा या शाळेने पालकांकडून अनेक वस्तू गोळा करून वाटल्या.

६. मुलांना बलपूर्वक ख्रिसमस ट्री बनवण्यास सांगणे !

ख्रिसमसला हिंदु मुलांनाही पुठ्ठे आदी साहित्य आणायला सांगून त्याचे ‘ख्रिसमस ट्री’ बनवायला सांगून संपूर्ण शाळाभर ते ठेवण्यात आले.

७. येशूच्या जन्माचे चित्रीकरण दाखवून मोठी रक्कम लाटणे !

ख्रिसमस सणाच्या आधी हिंदु मुलांना घेऊन येशूच्या जन्माचे चित्रीकरण सर्व मुलांना दाखवण्यात आले. त्यासाठी ज्युनियर आणि सिनियर के जी कडून ७५० रुपये घेण्यात आले. (पालकांनो, खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली किती दिवस ख्रिस्त्यांना पैसे पुरवून आपल्या मुलांवर कुसंस्कार करत रहाणार, हे ठरवा ! – संपादक)

८. पाश्‍चात्त्य पोशाख घालण्यास साधिकेने ठामपणे नकार देणे !

आमच्या मॅडम म्हणाल्या, ‘‘ख्रिसमस पार्टीला तुम्हाला पॅन्ट घालायची आहे.’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘नोकरी सोडेन; पण पॅन्ट घालणार नाही. मी नऊवारी साडी नेसून येईन.’’ (हिंदु शिक्षिकांना पाश्‍चात्त्य पोशाखाची बळजोरी हा धर्मांतराचाच प्रकार ! – संपादक)

९. प्रचंड खर्चाने चालवल्या जाणार्‍या या ख्रिस्ती शाळांना पैसा कोठून येतो, याचाही शोध घ्यावा लागेल !

येथे प्रत्येक शिक्षकाला १० सहस्र रुपयांहून अधिक वेतन आहे. २० ते २५ शिक्षक आहेत. इमारतीचे भाडे १ लक्ष ५० सहस्र आहे. अन्य कर्मचार्‍यांना ८ सहस्र वेतन आहे. अनुमाने ६ लाखांचा खर्च संस्थेला प्रतिमास आहे. हा खर्च कुठून भागवला जातो, ते लक्षात येत नाही.

– एक साधिका

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now