ईश्‍वरी कार्यास पूर्णपणे वाहून घेतलेले एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्या सत्संगात साधिकेने अनुभवलेली भावावस्था !

३ जानेवारी २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ च्या शिबिराच्या निमित्ताने…

सद्गुरु सिरियाक वाले

१. पू. सिरियाकदादांशी बोलतांना त्यांच्याकडून येणारे चैतन्य आणि प्रीती अनुभवता येऊन आनंद होणे

‘काल मला पू. सिरियाकदादांचा सत्संग लाभला. ‘सेवेत साहाय्य होण्याच्या दृष्टीने पू. दादांचा सत्संग मिळणार’, हे समजल्यावर मला पुष्कळ आनंद होऊन माझा कृतज्ञता भाव जागृत झाला. ते माझ्याशी बोलत असतांना त्यांच्याकडून येणारे चैतन्य आणि प्रीती अनुभवत असल्याने मी आनंदावस्थेत होते. ‘त्यांच्या माध्यमातून साक्षात् ईश्‍वरच बोलत आहे’, असे मला जाणवले. ते सौम्य स्वरात बोलत होते आणि त्यांचे बोलणे ऐकतांना मला शांत वाटून ‘त्यांचे बोलणे संपूच नये’, असे वाटत होते.

२. पू. सिरियाकदादांशी बोलतांना भाव जागृत होऊन डोळ्यांतून अश्रू येणे

‘पू. दादा निर्गुणाकडे जात असून ते सर्वसाधारण मनुष्याहून वेगळे आहेत. त्यांनी स्वतःला ईश्‍वरी कार्यास पूर्णपणे वाहून घेतले असून ते स्वतःलाही विसरून गेले आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्याशी काही मिनिटे बोलल्यानंतर कोणतेही विशेष प्रयत्न न करता माझी आपोआप भावजागृती झाली आणि डोळ्यांतून अश्रू आले.

३. एका साधकाला पू. दादांच्या आवाजात पुष्कळ चैतन्य जाणवणे

खोलीत आमच्या समवेत श्री. आद्रियन होते. त्यांनाही पू. दादांच्या आवाजात पुष्कळ चैतन्य जाणवले, तसेच शक्तीची अनुभूती आली. पू. सिरियाकदादांसारखे संत दिल्याविषयी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. लवनिता डूर्, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. (२१.३.२०१७)

(वरील लिखाण हे सद्गुरु सिरियाक वाले ‘सद्गुरु’ होण्याआधीचे असल्याने त्यांचा उल्लेख ‘पू. सिरियाक वाले’ असा आहे. – संकलक)


Multi Language |Offline reading | PDF