वैभववाडी येथे आज महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह कलादालनाचे उद्घाटन

वैभववाडी – महापराक्रमी थोर युगपुरुष महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनाशी निगडित देशातील दुसरे आणि महाराष्ट्र राज्यातील पहिले कलादालन आणि सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन ६ जानेवारी या दिवशी होणार आहे.

सार्‍या देशाला ललामभूत अशा राजघराण्यातील एक शाखा असलेली रावराणे, राणे, गोव्यातील सत्तरी तालुक्याचे राणे, शृंगारपूरकर सुर्वे, खानविलकर या रक्तामासाच्या बंधूंची मूळभूमी उदयपूर, चितोड असल्याचे कर्नाटकातील हेळव्यांचा भाटाच्या पोथडीत मोडी लिपीतील वंशावळ सापडल्याने, तसेच इतिहासातील विविध संदर्भ, पुरावे, आजतगायत चालत आलेल्या मेवाडच्या रूढी परंपरा आणि चालीरिती यांवरून सिद्ध झाले आहे. हीच मूळ भूमी असलेल्या मेवाडचे ७६ वे दिवाण अरविंदजी सिंह आणि महाराणा प्रतापसिंह यांच्या घराण्यातील युवराज कुवर लक्ष्यराज सिंह, मेवाड देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिल्या महाराणा प्रतापसिंह कलादालनाच्या उदघाटन समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. यांसह या कार्यक्रमाला श्रीमंत संभाजी राजे छत्रपती, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे,  खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांसह स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला क्षत्रिय राजपूत समाज, कोकण विभाग मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF