गोव्याची खा, प्या आणि मजा करा, ही प्रतिमा पालटली पाहिजे ! – डॉ. (सौ.) मृदुला सिन्हा, राज्यपाल

पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – गोव्याची खा, प्या आणि मजा करा, ही प्रतिमा पालटली पाहिजे. गोव्याकडे खूप काही देण्यासारखे आहे. गोव्याची बाहेर निराळीच प्रतिमा निर्माण झाली आहे. गोव्याची खरी प्रतिमा जगाला दाखवली पाहिजे, असे प्रतिपादन गोव्याच्या राज्यपाल डॉ. (सौ.) मृदुला सिन्हा यांनी केले. राजभवन दर्शन उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

राज्यपाल डॉ. (सौ.) सिन्हा पुढे म्हणाल्या, गोव्याची संस्कृती योग्य पद्धतीने मांडली गेली पाहिजे. गोव्याची जशी प्रतिमा आहे तसा गोवा नाही, तर गोवा हा निराळा आहे, हे दाखवून दिले पाहिजे. राजभवन दर्शन उपक्रम चालू करतांना लोकांकडून अनेक सूचना आल्या. यामधील गोव्यातील संस्कृतीला प्रोत्साहन देणार्‍या सूचनांचा विचार केला जाणार आहे. राजभवन दर्शन उपक्रमात दर्शकांना गोव्याविषयी अधिक माहिती मिळावी, यासाठी गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या कार्यक्रमांचा समावेश केला जाणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF