एकांगी दृष्टीचे पत्रकार कधी समाजाला खर्‍या बातम्या देऊ शकतील का ? अशांना ‘चांगले पत्रकार’ म्हणता येईल का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अनेक मुले आणि तरुण साधना करण्यासाठी सनातनच्या आश्रमांत येतात. हल्लीचे पत्रकार केवळ त्यांच्या आई-वडिलांच्या मुलाखती घेऊन ‘सनातनवाले मुलांना पळवतात’, असे आरोप सनातनवर करतात. ‘मुलांनी घर का सोडले ?’, असे मुलांना विचारावे’, असे एकाही पत्रकाराला वाटत नाही. त्यामुळे ते एकच बाजू समाजापुढे मांडतात. असे करणे म्हणजे न्यायाधिशांनी आरोपीचे न ऐकता फक्त तक्रारदाराचे ऐकून न्याय देणे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF