राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य:स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे रविवारचे विशेष सदर : ६.१.२०१९

१२५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या नि जगात सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मिरवणार्‍या भारतीय लोकशाहीचे धिंडवडे निघाले आहेत, असे कोणाला वाटल्यास त्यात वावगे वाटण्यासारखे काही नसावे. याचे कारण असे की, आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रात घसरण चालू आहे. दुसरीकडे बहुसंख्यांक असणार्‍या हिंदूंच्या देशात हिंदूंनाच सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. याची असंख्य उदाहरणे देता येतील. ही सर्व परिस्थिती लोकशाहीची निरर्थकताच स्पष्ट करते.

या एकूण परिस्थितीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासम आदर्श नि पितृवत् राज्यकर्त्यांच्या लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे. प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

सत्य आणि धर्म एकच असतात, हे ज्ञात नसलेले संघाचे नेते !

‘सत्यापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे. त्यामुळे न्यायालयांनी मर्यादा ओलांडू नये. सर्वोच्च न्यायालयाने सर्वच सूत्रांना समान महत्त्व द्यावे आणि रामजन्मभूमीचा वाद लवकर सोडवावा’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी केले. ते ‘अखिल भारतीय अधिवक्ता परिषदे’च्या १५ व्या अधिवेशनात बोलत होते.’

————————————————————————————————————————————————————–

असे आहे, तर एफ्.डी.ए.च्या कर्मचार्‍यांना पगार देऊन पोसायचे कशाला ?

‘गोवा राज्य सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातलेली असली, तरी हे पदार्थ गोव्यात सर्वत्र सहजतेने उपलब्ध आहेत. असे असूनही अन्न आणि औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) मागील ३ वर्षांत गुटखाविक्रीच्या विरोधात केवळ दोनच प्रकरणे नोंद केली आहेत.’

————————————————————————————————————————————————————–

पोर्तुगालमुळे नाही, तर भारत सरकारच्या निष्क्रियतेमुळे स्वातंत्र्यसैनिकांना गोवा मुक्तीनंतरही पोर्तुगीज कारागृहात रहावे लागते, हे लज्जास्पद !

‘गोवा मुक्तीनंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पोर्तुगीज कैद्यांची सुटका केली. त्या वेळी त्यांना अपेक्षित होते की, पोर्तुगालमधील गोमंतकीय कैद्यांना तात्काळ सोडले जाईल; मात्र पोर्तुगालने तशी माणुसकी दाखवली नाही. त्यामुळे गोवा मुक्तीनंतरही मला तब्बल ८ वर्षे पोर्तुगालमधील कारागृहात खितपत पडावे लागले.’ – गोवा मुक्तीलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे

————————————————————————————————————————————————————–

विडी आणि एकूणच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने शारीरिक, मानसिक अन् आर्थिक हानी होते, हे जगजाहीर असतांना केवळ सरकारला महसूल मिळतो; म्हणून कुठल्याही देशात अशा पदार्थांवर आणि तंबाखूच्या उत्पादनांवर बंदी घातली जात नाही, हे विज्ञानवादी मनुष्याला लज्जास्पद होय !

‘देशात नियमितपणे विडी ओढणार्‍यांची संख्या अनुमाने ७ कोटी २० लाख इतकी असून त्यांत १५ वर्षे वयोगटापासूनच्या मुलांचा समावेश आहे. तंबाखूजन्य विडीचे सेवन केल्याने होणार्‍या व्याधींमुळे भारताची प्रतिवर्षी ८० सहस्र कोटी रुपयांची हानी होते’, अशी माहिती ‘टोबॅको कंट्रोल’ या ‘जर्नल’मध्ये देण्यात आली आहे.’

————————————————————————————————————————————————————–

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची कार्यवाही व्हावी, यासाठीही राष्ट्रप्रेमींना मागणी करावी लागणे सरकारला लज्जास्पद !

‘सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याविषयी दिलेल्या निर्णयाचे पालन करून २५ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ या कालावधीत फटाके फोडण्यावर बंदी घालावी’, अशी मागणी सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.’

————————————————————————————————————————————————————–

महत्त्वाच्या दाव्याचा निकाल १३ वर्षांनी लागणे लज्जास्पद !

‘सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती यांना चकमकीत ठार केल्याच्या प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या न्यायालयाने सर्व २२ आरोपींना डिसेंबर २०१८ मध्ये दोषमुक्त केले. वर्ष २००५ पासून त्यांच्यावर खटला चालू होता.’

————————————————————————————————————————————————————–

‘प्रभु रामचंद्रांचे भक्त असलेल्या हनुमानाची मोगलांनीही इतकी विटंबना केली नाही, तितकी विटंबना भाजप नेत्यांकडून केली जात आहे. एक भाजप नेता म्हणतो, ‘हनुमान चिनी आहे.’ ‘चिनी’ म्हणजे हनुमान बनावट आहे का ?, बोगस आहे का ? कारण चिनी वस्तू बोगस असतात. दुसरा एक महाभाग म्हणतो ‘हनुमान मुसलमान आहे.’ हनुमानाचा धर्म ठरवणारी ही मंडळी उद्या अयोध्येतील ‘हनुमान गढीही मशीद आहे’, असा दावा करून ती तोडण्यास मागे-पुढे पहाणार नाहीत. अशा भाजपच्या नेत्यांना रामायणावर बोलण्याचा अधिकार नाही.’ – खासदार संजय राऊत, शिवसेना


Multi Language |Offline reading | PDF