ऑगस्टा वेस्टलँड आस्थापनाला काळ्या सूचीतून बाहेर काढण्यामागे भाजपचे नेते !

दलाल ख्रिश्‍चिअन मिशेल याच्या चौकशीतून उघड

काँग्रेस असो कि भाजप दोघेही सारखेच, हे आता जनतेने लक्षात घेऊन अशा भ्रष्टाचारी राजकीय पक्षांच्या लोकशाहीऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासारखे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हावे !

नवी देहली – ‘ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर’ खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) अटकेत असलेला दलाल ख्रिश्‍चिअन मिशेल याने चौकशीत आता भाजपच्या एका नेत्याचे नाव घेतले आहे. ‘या नेत्याने ऑगस्टा वेस्टलँड आस्थापनाला काळ्या सूचीतून बाहेर काढण्याची शिफारस केली होती’, असे मिशेल याने सांगितले आहे; मात्र या नेत्याचे नाव उघड झालेले नाही. गेल्या आठवड्यात काँग्रेसने ‘या आस्थापनाला काळ्या सूचीतून कुणी बाहेर काढले’, याचे उत्तर देण्याची मागणी भाजप सरकारकडे केली होती.

काही दिवसांपूर्वी मिशेल याने त्याच्या चौकशीत सोनिया गांधी आणि तांत्रिक चंद्रास्वामी यांचीही नावे घेतली होती, तसेच राहुल गांधी यांचे थेट नाव घेतले नव्हते; मात्र ‘इटलीच्या महिलेचा मुलगा’, असे म्हटले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now