पर्यटक पोलिसांची सासष्टी किनारपट्टीवर मद्याशिवाय सहल जागृती मोहीम

शासनानेच आतापर्यंत गोव्याची (कु)प्रसिद्धी मद्य, मांस आणि महिला (वेशाव्यवसाय), अशी करून ठेवली आणि आता त्याचेच दुष्परिणाम दिसून येत आहेत, हे जाणावे !

मडगाव – केळशी ते माजोर्डा या सासष्टी तालुक्यातील किनारपट्टीवर मद्याशिवाय सहल करण्याविषयी पर्यटक पोलीस नागरिकांमध्ये जागृती करत आहेत. गोवा शासनाने सार्वजनिक स्थळांवर मद्यप्राशन करण्यावर बंदीचा अध्यादेश अजून काढलेला नाही. हा अद्यादेश कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकतो. नुकतेच पर्यटक पोलीस उपनिरीक्षक आनंदु राणे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या गटाने बेताळभाटी येथील समुद्रकिनार्‍यावर जाऊन सहलीसाठी आलेल्या एका गटाला त्यांनी आणलेल्या मद्य आणि बिअरच्या बाटल्या पुन्हा बॅगेत ठेवण्यास भाग पाडले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास किंवा धूम्रपान केल्यास कारवाई करण्याची चेतावणीही या पोलिसांच्या गटाने दिली. हा नियम पर्यटकांसमवेतच स्थानिकांनाही लागू असल्याचे पर्यटक पोलिसांनी सांगितले. बेताळभाटी पंचायतीचे सरपंच मिरांडा यांच्या मते बेताळभाटी येथील ३ समुद्रकिनार्‍यांवर पंचायतीने समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन न करण्याविषयी जागृती फलक लावले आहेत आणि यामुळे समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणे बंद झाले आहे.


Multi Language |Offline reading | PDF